esakal | मध्य रेल्वेद्वारे दिवाळीनिमित्त पाच वन वे विशेष गाड्या !
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य रेल्वेद्वारे दिवाळीनिमित्त पाच वन वे विशेष गाड्या !

एकेरी विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला असून, या रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. 

मध्य रेल्वेद्वारे दिवाळीनिमित्त पाच वन वे विशेष गाड्या !

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : सणासुदीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी, मुंबई- सहरसा / समस्तीपूर आणि पुणे-मुझफ्फरपूर दरम्यान एकेरी विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला असून, या रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. 

आवश्य वाचा- मी शिवसेनेचा सोंगाड्या, खासदार पाटील यांना नाचविणार ! -

लोकमान्य टिळक टर्मिनस-सहरसा वन वे स्पेशल
गाड़ी क्रमांक 02151 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस – सहरसा ही 9 नोव्हेंबर रोजी दहाला सुटेल व दुसर्‍या दिवशी सहरसा ला रात्री 8.15 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, पटना आणि खगेरिया या स्थानकावर थांबेल.

मुंबई-सहरसा वन वे स्पेशल गाड़ी क्रमांक 02153 डाउन विशेष गाड़ी 9 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी दोनला सुटेल व तिसर्‍या दिवशी रात्री 12.45 वाजता सहरसाला पोहोचेल. हि गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय, पटना आणि खगेरिया येथे थांबेल. पुणे-मुझफ्फरपूर वन वे स्पेशल गाड़ी क्रमांक 01153 डाउन विशेष गाड़ी पुणे हुन 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.50 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी पहाटे 3.10 वाजता मुझफ्फरपूरला पोहोचेल. ही गाडी अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय जं. आणि पाटलीपुत्र येथे थांबेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर वन वे स्पेशल गाड़ी क्रमांक – 02157 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 9 नोव्हेंबर रोजी रात्री 8.35 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी समस्तीपूरला पहाटे 5 वाजता पोहोचेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज, पं. दीनदयाल उपाध्याय जं., पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर थांबेल.


वाचा- आदीवासी विद्यार्थ्यांना आता ‘सीबीएसई’तून मिळणार शिक्षण ! 
 

समस्तीपुर उत्सव विशेष गाड़ी
11 नोव्हेंबर पासून आणखी उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत. यात गाड़ी क्रमांक – 01021 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – समस्तीपुर विशेष गाड़ी ही 11 ते 28 नोव्हेंबर पर्यंत दर बुधवार , शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन दुपारी 4.40 वाजता प्रस्थान करुन तिसर्या दिवशी सकाळी 4 वाजता समस्तीपुर ला पोहचेल . गाड़ी क्रमांक -01022 अप समस्तीपुर - लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाड़ी ही 13 ते 30 पर्यंत दर शुक्रवार ,सोमवार ला प्रस्थान स्टेशन हुन 9.50 वाजता प्रस्थान करुन तिसर्या दिवशी सकाळी सायंकाळी 6.40 वाजता समस्तीपुर ला पोहचेल. ही गाडी नासिक ,भुसावल ,इटारसी ,जबलपुर ,कटनी ,सतना ,मानिकपुर ,प्रयागराज छोइकी ,पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन ,बक्सर ,आरा ,पाटलिपुत्र ,हाजीपुर ,मुजफ्फरपुर येथे थांबेल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top