esakal | हतनूर धरणातून ७६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Hatnur Dam

हतनूर धरणातून ७६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस (Rain) सुरू असल्याने गुरुवारी रात्री आठला धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सध्या ७६ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग (Discharge of water)सुरू असून, तापी नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा: धुळे कृआबाचा ऐतिहासिक निर्णय..अडत्याशिवाय होणार शेतमालाची खरेदी

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरू असल्याने नद्यांची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे धरणातील आवकही वाढत आहे. धरणाची वाढती पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत धरणाचे अंदाजे दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. मात्र, पाणी वाढतच असल्याने रात्री आठला २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून ७६ हजार ९१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापीपात्रात सोडण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

हेही वाचा: बंधारा फोडण्यापर्यंत वाळूचोरट्यांची मजल!

तापी नदीकाठावर सतर्क
तापी नदीकाठावरील सर्व नागरिक व सर्व शासकीय यंत्रणांनी सावध राहावे. नदीकाठावरील गावातील लोकांनी तापी नदीपात्रात जाऊ नये, आपली जनावरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत, तसेच नदीपात्रालगतची आपली शेतीपयोगी साहित्य, सामग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील, याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी, असे हतनूर प्रशासनाने कळविले आहे.

loading image
go to top