esakal | हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

Hatnur Dam

हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले

sakal_logo
By
टीम ई सकाळ


भुसावळ : जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली (Increase in water level) आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी सहाला धरणाचे दहा दरवाजे (Dam Open Gate) पूर्ण उघडण्यात येऊन, तापी नदीपात्रात १७ हजार ९२ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (jalgaon district hatnur dam watershed area rain dam ten gate open)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;कोविड रुग्णांसाठी मोहाडी रुग्णालय सज्ज

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मर्जी दाखवीत, शेती पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात आगमन केले आहे. सध्या जिल्हाभरात चांगला पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात भरीव वाढ झाल्याने दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे, तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर पसरली आहे.


धरणातील उपलब्ध साठा आणि विसर्ग

हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणाची पातळी २०९.१९० मीटरवर जाऊन, ४४.५१ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. धरणात पाण्याची आवक वाढत असून, १७ हजार ९२ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, तर कालव्याद्वारे ३०० क्यूसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे.

हेही वाचा: बिबट्याने अंगणात बांधलेल्या घोड्याला केले फस्त;आणि एकच खळबळ

सायंकाळी पाण्याची आवक वाढली
सुरवातीला मध्य प्रदेश आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने तापी-पूर्णा नदीला पूर येऊन हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली होती. आता जिल्ह्यात हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मंगळवारी (ता. २०) सायंकाळी सहाला धरणाचे दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात १७ हजार ९२ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीची पातळी वाढून तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी नदीवर जाऊ नये किंवा जनावरांना नदीकाठालगत सोडू नये, असे आवाहन हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे.

loading image