esakal | बिबट्याने अंगणात बांधलेल्या घोड्याला केले फस्त;आणि एकच खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

बिबट्याने अंगणात बांधलेल्या घोड्याला केले फस्त;आणि एकच खळबळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ


खापर ः अक्कलकुवा शहराजवळील मिठाफळी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून मिठ्याफळी येथील अश्‍वावर बिबट्याने हल्ला (Leopard attack) करून फस्त केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे (Villagers Fear) वातवरण पसरले आहे.

(nandurbar district akkalkuwa city near mithfali village leopard attack)

हेही वाचा: धुळे-नंदुरबारमधील शेळी,कुक्कुटपालन व्यवसायाला मिळणार चालना

अक्कलकुवा शहराजवळील मिठाफळी येथील अहमद पठाण यांचा मालकीचा अश्‍व घरासमोरील अंगणात बांधला होता. काल (ता१९) रात्री बिबट्याने त्याचावर हल्ला करून प्रथम गंभीर जखमी केले. त्यानंतर अश्‍व खाली पडल्याने बिबट्याने त्याला फस्त केले.सकाळी अहमद पठाण उठल्यावर घराबाहेर आले तेव्हा त्यांचा अश्‍व जमिनीवर मृतावस्थेत पडलेला दिसला. परिसरात बिबट्याचा पाऊलांचे ठसे दिसून आले. ही घटना परिसरात पसरल्यावर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली, तसेच भितीचे वातावरण पसले आहे. परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त वावर असल्याचे नागरिकांकडुन सांगण्यात येत आहे.अनेक वेळा मिठाफळी येथील नागरिकांनी बिबट्याला पाहिले आहे व परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा देखील आढळलेल्या आहेत. बिबट्याने आता पर्यंत मिठाफळी येथील अनेक लहान मोठ्या जनावरांसह शेळी, पारडे व इतर पाळीव प्राण्यांवर हल्ला करुन त्यांना फस्त केले आहे. विशेषतः नागरिकांच्या घराबाहेरील अंगणातून बिबटयाने जनावरांना नेले आहे.

हेही वाचा: ओडिशाच्या उदयगिरी, खंडागिरी लेण्या पर्यटकांसाठी खास आकर्षक!

वन विभागाला अपयश..

यासंदर्भात येथील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार देखील केली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी करून बिबट्या असल्याची खात्री करुन घेत नेट व पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते, त्यामुळे बिबट्याने अन्य परिसरात स्थलांतर केले असावे या अंदाजाने वन विभागाने प्रयत्न सोडले होते.

हेही वाचा: पुणे-मुंबईसह जळगावच्या बेरोजगार तरुणांची २९ लाखांची फसवणूक

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण..
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात तसेच अक्कलकुवा,खापर वाण्याविहिर व परिसरात ऊस व मक्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते.त्यामुळे बिबट्या गरजे प्रमाणे स्थलांतर करीत असावा, असा नागरिकांचा अंदाज आहे.अनेक वेळा मिठाफळी येथील शेतकऱ्यांना ऊसाच्या व मक्याच्या शेतात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे.बिबट्याच्या संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे अशाच प्रकारे बिबट्याचा वावर सुरु राहिल्यास मोठ्या जीवितहानी ची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शेती कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण होईल त्यामुळे वन विभागाने बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून नागरिकांमधील भीती दूर करावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

loading image