खडसेंचा दणका सुरूच ; हजारो भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

दिपक चौधरी
Saturday, 7 November 2020

मुक्ताईनगर परिसरातील कुऱ्हा काकोडा परिसरात खडसेंनी दौरा करत भाजपचे हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कुऱ्हा काकोडा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी भाजपला दे धक्का देणे सुरूच केले आहे. त्यात जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. त्यात शुक्रवारी मुक्ताईनगर परिसरातील कुऱ्हा काकोडा परिसरात खडसेंनी दौरा करत भाजपचे हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

आवश्य वाचा- श्रीराम रथोत्सवाची दीडशतकी परंपरा कायम; पण उत्सवाला मर्यादा
 

या दौरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ उपस्थित होते.

यावेळी त्यांनी डोलारखेडा,नांदवेल, चिंचखेडा बु, वायला, महालखेडा, टाकळी, वडगाव, निमखेडी बु,बोदवड इच्छापूर ,चारठाणा येथे भेटी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतल्या
या प्रत्येक गावातील शेकडो भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर संध्याकाळी कुऱ्हा काकोडा येथे कमलसेठ गोयनका यांच्या घरासमोर गावातील पक्ष पदाधिकारी यांच्या प्रवेश सोहळा झाला. या कार्यक्रमात यावेळी भाजप शहराध्यक्ष अवधुत भुते, माजी सरपंच ओमप्रकाश चौधरी ,ररणजीत गोयनका, भागवत सेठ राठोड ,राजकुमार खंडेलवाल ,रमेशसेठ खंडेलवाल,माणिक पाटील मयूर साठे माणिक पाटील, सुशील भुते ,शंकर मोरे यांच्यासह 300 कार्यकर्ते आणि सुळे, पारंबी,हलगोटा,लालगोटा येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जि प सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी किसानसेल जिल्हाध्यक्ष सोपानराव पाटील, बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे,तालुकध्यक्ष यु डी पाटील सर,महिला आघाडी तालुकाध्यक्ष लताताई सावकारे,माजी सभापती दशरथभाऊ कांडेलकर,विलास धायडे, राजु माळी,माजी जि प सदस्य सुभाष पाटील,ह भ प विशाल महाराज खोले,रामभाऊ पाटील,रविंद्र दांडगे, राजेश ढोले, शेषराव पाटील,कल्याण पाटील,सुभाष टोके, सुनिल काटे, शिवराज पाटील,मुन्ना बोडे,दोमोदरे,सुभाष खाटीक,योगेश कोलते, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal muktainagar thousands of BJP workers join NCP