खोदकाम करतांना सापडली जूनी नाणी आणि गावात पसरली अफवा !

खोदकाम करतांना सापडली जूनी नाणी आणि गावात पसरली अफवा !
Updated on

भुसावळ : तालुक्यातील गोजोरे गावात जुन्या घराचे खोदकाम करताना नाणी सापडल्याची घटना घडली. मात्र गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने पोलीसांना माहिती देऊन पाहणी करण्यात आली.


या बाबत माहिती अशी की बुधवारी (ता. 19) दुपारी परशुराम ज्ञानदेव राणे रा. गोजोरा यांच्या जुने घरच्या भिंती पाडण्याचे काम सुरू होते . यावेळी परशुराम राणे यांच्या घरातील देवघर ( देव्हारा ) जवळ सोन्याची घागर सापडल्याची अफवा गावात पसरली असता पोलीस पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन मध्ये ही माहिती कळवली असता भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो.नि.रामकृष्ण कुंभार यांनी या बाबत माहिती तहसीलदार भुसावळ यांना सांगितली आणि पो नि रामकृष्ण कुंभार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन गोजोरे गावात येऊन घटना स्थळी पाहणी केली असता जुन्या काळातील 1862 ,1872 ,1886 आणि 1901 या सालातील एकूण 19 नाणी असल्याचे सांगितले . या ठिकाणी सहा.पो.नि . अमोल पवार व भुसावळ तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार शशीकांत इंगळे यांनी पंचनामा करून सर्व नाणी सील करण्याचे काम राञी ऊशीरा पर्यंत सुरु असल्याचे समजते.


गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने गोजोरे येथील राणे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समजते आणि वेळीच पोलीस व महसूल चे अधिकारी व कर्मचारी पोहचल्याने नाण्यांची सत्यता बाहेर आली असे सुज्ञ नागरिकांनी सांगितले या परिसराचे मंडळ अधिकारी सतिश इंगळे यांनी याबाबत माहिती दिली . यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे विठ्ठल फुसे , युनूस शेख व पोलीस कर्मचारी उपस्थित होते . या घटनेनंतर गावात मात्र ठिकठिकाणी गावकरी चर्चा करतांना दिसत होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com