रेल्‍वेला मिळाले वीस दिवसात ३१ लाख

चेतन चौधरी
Thursday, 1 October 2020

कोरोना काळात अनलॉक नंतर हळूहळू प्रवासी गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येत आहे. यातच अनलॉक नंतर सुरू असलेल्या रेलवे प्रवासी गाड्या यो पूर्वीच्या मानाने कमी आहेत.

भुसावळ : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती व नंतर काही विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र अनलॉक प्रक्रियेत २ सप्टेंबरपासून आंतरराज्य रेल्वे प्रवासाला मुभा दिल्यामुळे रेल्वेच्या उत्पात ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या २० दिवसात भुसावळ रेल्वे स्थानकावरुन तब्यल ११ हजार प्रवाशांनी ३१ लाखांचे तिकीट बुकिंग केले आहे.

कोरोना काळात अनलॉक नंतर हळूहळू प्रवासी गाड्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येत आहे. यातच अनलॉक नंतर सुरू असलेल्या रेलवे प्रवासी गाड्या यो पूर्वीच्या मानाने कमी आहेत. तसेच करोना काळामध्ये अनेक तात्रिक अडचणी रेल्वे प्रशासनाने दूर केलेल्या आहेत. यात सिग्नल, रेल्वे रुळावरील दुरुस्ती, फलाटांची दुरुस्ती अशी अनेक कामे पूर्ण केले आहेत. तसेच पूर्वीपेक्षा गाड्या कमी असल्याचाही वेळेवर गाडया सुटण्यास लाभ होत आहे.

क्लोन गाड्यामुळे दिलासा
लॉकडाऊनच्या काळात सर्वच रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. त्यानंतर 19 जूनपासून देशभरात दोनशे विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यापैकी 40 गाड्या भुसावळ विभागातून धावत आहे. त्यात सहा क्लोन गाड्यांची भर पडल्याने भुसावळ भागातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या आता 50 च्यावर गेली आहे. या गाड़ीमध्ये फक्त आरक्षण राहिल, या गाड्यांचा अग्रिम आरक्षण अवधि हा दहा दिवसाचा असेल. अनेक रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे रल्वेतर्फे आता क्लोन रेल्वेगाड्यांचा (एकाच मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्या) पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना नियमित गाडीने कन्फर्म तिकीट न मिळाल्यास त्याच मार्गावर धावणाऱ्या क्लोन गाडीत प्रवाशांना कन्फर्म बर्थ मिळणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भुसावळ विभागातून अप व डाऊन मार्गावर आठवडाभरात सहा क्लोन गाड्या धावणार आहेत.

अनेकांनी केली बुकींग
भुसावळ रेल्वेस्थानका वरून आंतरराज्य तसेच इतर राज्यांमध्ये जाण्यासाठी 1 ते 90 सप्टेंबर या कालखंडात 5 हजार प्रवाशांनी तिकीट बुकिंग केली आहे. व यातून रेल्वे प्रशासनाला 14 लाख 86 हजारांचे उत्पन मिळाले तर 1ते 20 स्टेंबर या कालखंडामध्ये रेल्वे प्रवाशांमध्ये वाढ झाली व नंतरच्या दहा दिवसात पाच हजार 700प्रवाशांनी 15 लाख 95 हजार रुपयांचे तिकीट बुक करून रेल्वे प्रवास सुनिश्चित केला. एकंदरीत 2 सप्टेंबरपासून आंतरराज्य प्रवासासाठी मुभा मिळाल्यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल 40 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

फक्त आरक्षण तिकीट असल्यास प्रवासाची मुभा
कोरोनाकाळामध्ये खऱ्या अर्थाने रेल्वेने सुसहय प्रवास होत आहे. पूर्वी सामान्य, सलीपर क्लास व एसी क्लास मधून वेटिंग तिकीट जरी असले तरी दरवाजा पर्यंत भरगच्च गदीसह प्रवास करावा लागत होता. मात्र कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाने प्रवासासाठी निर्बंध घातले असून प्रवासाकरीता फक्त कन्फर्म तिकीट असेल त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात आहे. दरम्यान आता हळूहळू प्रवाशांची संख्या वाढत असल्याने रेल्वेचे उत्पनही आणखी पुढे निश्‍चितच वाढणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal railway after unlock 31 lakh last twenty days