आली आली किसान एक्सप्रेस...चला भाजीपाला भरूया; शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर

kisan express railway
kisan express railway

भुसावळ : शेतकऱ्यांच्या मालास व्यापक बाजारपेठ मिळून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने किसान एक्सप्रेस सुरू केली. या एक्स्प्रेसमुळे शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जात असल्याने प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गाडीच्या फेऱ्यामध्ये वाढ करून आता दोन दिवस चालविली जाणार आहे.

कोल्हापुर/दौंड- मनमाड  लिंक किसान पार्सल विशेष ट्रेनमध्ये परिवर्तन सांगोलाहुन प्रस्थान आणि गाड़ी आता आठवड्यातून दोन दिवस धावणार असून, शुक्रवार आणि मंगळवार गाडी रवाना होईल. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी २५ ऑगस्टपासून दर शुक्रवार आणि मंगळवार ला “किसान रेल” पार्सल गाड़ी चालवली जात आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त प्रमाणात माल पाठविता येईल. या गाडीच्या प्रस्थान स्टेशनमध्ये बदल करण्यात आला आहे. ही गाड़ी आता सांगोला या स्टेशनवरून प्रस्थान करेल. 

असा आहे वेळ
गाड़ी क्रमांक ००१०९ डाऊन कोल्हापुर -मनमाड लिंक विशेष किसान पार्सल गाडी सांगोलाहुन प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसहाला मनमाडला पोहोचेल.
गाड़ी क्रमांक ००११० अप मनमाड-दौंड  लिंक विशेष किसान पार्सल गाड़ी मनमाडहून प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी रात्री आठला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दौंडला ००.२० वाजता पोहोचेल.

गाडीचे थांबे आणि व्यवस्था
सदर गाडी मार्गात पंढरपुर, कुर्दुवाडी, दौंड, बेलवडी, अहमदनगर, बेलापुर, कोपरगाव आणि मनमाड नंतर देवळाली - मुजफ्फरपुर- किसान पार्सल गाडीचे थांबे असतील. यात सांगोलाहुन १० व्हीपीयू आणि १ लगेज कम गार्ड ब्रेक, आणि दौंड हुन २ व्हीपीयू, ही सर्व व्हीपीयू गाड़ी क्रमांक ००१०७/ ००१०८  देवळाली ते मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल गाड़ीला मनमाड येथे जोडली जाईल.

पहिलीच बहुपयोगी गाडी
यापूर्वी भारतीय रेल्वेने केळी आणि इतर एकल पदार्थांच्या निर्यातीसाठी विशेष रेल्वे चालवली आहे. मात्र, ही पहिलीच बहुपयोगी गाडी असून ती डाळिंब, केळी, द्राक्षे या फळांसह शिमला मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, कांदे, मिरच्या या भाज्यांची वाहतूक करणार आहे. स्थानिक शेतकरी, मजूर, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर व्यक्तींच्या सहाय्याने प्रभावी विपणन करण्यात येणार आहे. मागणीची एकत्रित नोंद केली जाईल.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com