
गुजरात राज्यातील नवसरी विद्यापीठात केळी आणि त्यापासून विविध उत्पादन बनविण्यासाठी खूप मोठं काम झालेलं आहे. ऑनलाइन लिटरेचर वाचून त्याचा नीट अभ्यास केला.
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुका केळीसाठी प्रसिद्ध आहे. या पिकामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक लाभाबरोबरच हजारो मजुरांना रोजगारही मिळतो. परंतु केळी घड काढल्यानंतर बाकीचे खोड, पाने आदी अवशेष शेतात किंवा बांधावर फेकून दिले जातात. थोड्या प्रमाणात गुरांचा चारा म्हणून त्यांचा उपयोग होतो.
आवश्य वाचा ः वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन् पवार !
केळी खोडापासून शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे, केळी खोडांच्या विल्हेवाटीसाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी केळीपासून धागा निर्मितीचा वेगळा प्रयोग यावल तालुक्यातील चार ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. यात भरीस भर म्हणून अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील डॉ. भूषण देव यांनी आता कागद निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला असून, याचा वापर औषधी उत्पादनांच्या वेस्टनासाठी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन अनेक जणांना रोजगारही मिळू शकतो. त्यामुळे रा ज्यातील हा एक अनोखा प्रयोग मानला जात आहे.
वाचा- शेतकऱ्यांना वीज, पाणी मुबलक उपलब्ध होणार
राज्यात एकूण 71 हजार 072 हेक्टरवर केळी लागवड केली जाते. यापैकी एकट्या जळगाव जिल्ह्यात 44 हजार 302 हेक्टरवर केळीची लागवड केली जाते. एका हेक्टरमध्ये सुमारे 4 हजार 444 खोड असतात. एक हेक्टर केळी पिकातून सरासरी 60-80 टन केळी खोड मिळते. शेतकरी ही खोडे बांध अथवा नाल्यात फेकून देतात, यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी आठ ते दहा हजार रुपये प्रती हेक्टर खर्च येतो. शेतकऱ्यांच्या पैशांची बचत व्हावी आणि थोडाफार आर्थिक आधार मिळावा, यासाठी केळीपासून धागा निर्मितीची प्रक्रिया काही वर्षांपासून केली जात आहे. यात आणखी भर म्हणून डॉ देव यांनी आता कागद निर्मितीचा प्रयोग हाती घेतला आहे.
खोडातील घटक
एका केळीच्या खोडाचे वजन अंदाजे 20 किलो असते. यात 2-3 किलो वजन हे आतील नाजूक भागाचे असते. उर्वरित केळीच्या खोडातून सुमारे 300 ते 400 ग्रॅम धागा व 15 ते 16 किलो भाग हा टाकावू असतो. यात 7 ते 8 लीटर पाणी असते. डॉ देव यांनी केळीपासून कागदनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. याचा वापर ते औषधी उत्पादनांच्या वेस्थानासाठी करतात.
गुजरातमध्ये केळीवर विविध प्रयोग
केळीपासून कागद बनविण्याची प्रक्रिया शोध घेत असतांना डॉ देव यांनी इंटरनेट वर सर्च केला. त्यानंतर युगांडा, श्रीलंका आणि जगातील ईतर केळी उत्पादक देशातील शेतकरी यांनी काम केल्याचे आढळून आले. गुजरात राज्यातील नवसरी विद्यापीठात केळी आणि त्यापासून विविध उत्पादन बनविण्यासाठी खूप मोठं काम झालेलं आहे. ऑनलाइन लिटरेचर वाचून त्याचा नीट अभ्यास केला आणि केळी पासून कागद बनविण्याची प्रक्रिया सुरू केली.
कागदनिर्मितीची प्रक्रिया
प्रथम केळीच्या सुडो स्टेमची(खोड) वाळलेली साल काढली जाते. त्याचे छोटे छोटे तुकडे करून, पुढे हे तुकडे पाण्यात चांगले उकळून घेतात. उकळताना थोडी राख मिसळली जेणे करून लगदा चांगला होईल. पाणी आटत आल्यावर त्यातील तुकडे वेगळे धोऊन काढले जाते. पुढे मिक्सरमध्ये याचा लगदा करून तो पाण्यात मिसळला. नंतर चाळणीच्या साह्याने गोल जाडसर लगद्याचा थर कापडावर घेऊन त्याला एका प्लेटवर उन्हात वळविण्यासाठी ठेऊन दिला. 5 ते 6 तासांनी जलांश निघून गेल्यानंतर केळीपासून कागद तयार होतो.
आवश्य वाचा- बीएचआर घोटाळा : अवसायकावर फोकस, कर्जदार मात्र दुर्लक्षित !
सतत संशोधन केल्याने मिळाले यश
डॉ.भूषण देव यांनी शिक्षण सुरू असे पासून केळीच्या वेस्ट मटेरियलपासून काही उपयोगी वस्तू बनवता येतील का? त्यासाठी अनेक लोकांच्या भेटी, पुस्तकांचा अभ्यास केला. बऱ्याच शोधानंतर कागद बनविण्याची प्रक्रिया घरीच करून बघायच असं ठरलं. आधी आवश्यक त्या साधन सामग्री एकत्र करून प्रक्रिया प्रारंभ केली. सतत 10 ते 12 तास काम करून अतिशय सुंदर कागद तयार झाला.
आपण आपल्या हाताने कागद बनवू असे स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि आज केळीच्या झाडापासून कागद बनताना बघून फार आनंद झाला. गावातच रोजगार निर्मिती होण्यासाठी केळीवर संशोधन होणं फार गरजेचे आहे. केळीपासून पिशव्या, व्हॅलेट, कापड, प्याकिंग मटेरील, फूड प्रोडक्टस, फर्टिलायझर्स, एनर्जीड्रिंक्स आदी अनेक पर्यावरणपूरक वस्तू बनविता येतात. केळीपासून तयार झालेला कागद औषधासाठी पिशवी, कोटिंग आणि पॅकिंग म्हणून वापरण्याचा विचार आहे. तसेच कागदाची निर्मिती करण्याच कार्य निरंतर सुरू ठेवण्याचा मानस आहे.
- डॉ.भूषण देव
अंतुर्ली, (ता. मुक्ताईनगर)
संपादन- भूषण श्रीखंडे