
अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणीसुध्दा केलेली असल्याने शेतकऱ्यांना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
जळगाव : शेतीला अखंडितपणे पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा होण्यासाठी वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. पाणी हेच जीवन असून वीज व रस्ते हे विकासाचे माध्यम आहे. प्रत्येक घरात वीज, पाणी पोचविण्यासाठी व रस्त्यांच्या विकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
आवश्य वाचा- वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन् पवार !
बोरगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत बांधलेल्या ३३/११ के. व्ही. उपकेंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, वरूण राजाची कृपादृष्टी चांगली असल्यामुळे सर्वच बंधारे व नद्या - नाले तुंडूब भरून वाहत आहेत. त्या बरोबरच अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणीसुध्दा केलेली असल्याने शेतकऱ्यांना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. बोरगाव गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या मार्गावर असून जलमिशन योजनेंतर्गत गाव तेथे पाणी व हर घर जल योजना राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा- पाडळसरे प्रकल्पासाठी ३५ कोटींचा निधी वितरित
जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, वीज, पाणी व रस्त्यांसाठी पालकमंत्री पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही त्यांचे या कामांसाठी प्राधान्य राहिल. यावेळी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, बोरगावचे सरपंच भिकनराव मराठे, उपसरपंच रविंद्र मराठे, विलास महाजन, पप्पू पाटील, भानुदास विसावे, इंफ्राचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, धरणगावचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, मनीष धोटे, देवेंद्र चौधरी, शिरीष सोळंके, प्रोजेक्ट मॅनेजर धननिल वाणी, पं. स. सदस्य प्रेमराज पाटील, भैया मराठे, निंबा कंखरे यांच्यासह विवरे, भवरखेडा परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन- भूषण श्रीखंडे