esakal | दिवाळी स्‍पेशल..पुणे, मुंबईसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

special railway

रेल्वे प्रशासनाकडून शनिवारपासून (ता. १४) या गाड्या सुरू करण्यात आल्या. 

दिवाळी स्‍पेशल..पुणे, मुंबईसाठी दोन विशेष रेल्वेगाड्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता पुणे - गोरखपूर व एलटीटी-हटिया दरम्यान विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून शनिवारपासून (ता. १४) या गाड्या सुरू करण्यात आल्या. 

लोकमान्य टिळक टर्मिनस- हटिया अतिरिक्त उत्सव विशेष गाडी (अप ०८२२५) १४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी हटिया येथून ९.४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी १.३५ वाजता पोहोचणार आहे. तर ही उत्सव गाडी डाऊन मार्गावर (०८२२६) १६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल आणि हटियाला दुसऱ्या दिवशी चारला पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक व नियमित गाडी क्रमांक १२८१२/१२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेप्रमाणेच थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत. 

पुणे-गोरखपूर उत्सव गाडी 
पुणे ते गोरखपूर (डाऊन ०२०३१) ही गाडी १४ ते २१ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार व शनिवारी सव्वाचारला सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी साडेदहाला गोरखपूर स्थानकावर पोहोचेल. गोरखपूर ते पुणे (अप ०२०३२) गाडी ही १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवार व सोमवारी प्रस्थान स्थानकाहून सव्वाला मार्गस्थ होईल व दुसऱ्या दिवशी पुणे स्थानकावर ८.०५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाल, बिना, झांसी, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बस्ती या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत. दरम्यान, केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असली तरी प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड कोविड १९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे