crop
cropcrop

दुबारा पेरणी टळली; भुसावळ तालुक्यात पावसाने शेतकरी सुखावला

खरिपाच्या ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा शासकीय अहवाल आहे.



भुसावळ : तालुक्यात पावसाच्या (Rain) प्रतिक्षेत असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी (Farmer) १७ जून पूर्वीच धुळ पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाचा अंदज चुकल्याने या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट (Sowing crisis) आले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.दरम्यान, आतापर्यंत ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. मात्र शासकीय आकडेवारी ३५ टक्केंवर असल्याचे सांगण्यात आले. (bhusawal taluka two day good rain farmers happy)

crop
शेतकऱ्यांवर नवीन संकट; उसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव!

या वर्षी जुन महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने तालुक्यात हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी १० जुन नंतर मृग नक्षत्राचा योग साधुन बागायती व कोरडवाहु क्षेत्रात पावसाच्या अपेक्षेने १७ जूनपूर्वीच काही प्रमाणात पेरण्या केल्या होत्या. मात्र पाऊस लांबल्याने या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून परिसरात झालेल्या पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी सुखावला आहे.


यंदा कपाशीच्या पेर्‍यात पुन्हा वाढ
तालुक्यात या वर्षी कपाशीच्या पेर्‍यात पुन्हा वाढ झाली आहे. तर ज्वारी, मका, सोयाबिन यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षात सप्टेंबर महिन्यातही पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे उडीद, मुग, सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रामाणत नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी या पिकांकडे पाठ फिरविली असून कपाशीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

crop
१५ फुट अजगाराचा हल्ला..आणि डोळ्यासमोर शेळी केली फस्त


३४ टक्के पेरण्या
दरम्यान, १८ जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाच्या ३४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याचा शासकीय अहवाल आहे. यात आठवडाभरात आणखी वाढ झाली असल्याची शक्यता आहे. या आकडेवारीनुसार, कपाशी लागवडीच्या १५ हजार ५१२ हेक्टर क्षेत्रापैकी कोरडवाहु २४५० हे. तर ५५३२ बागायती असे एकुण ७ हजार ९८२ हे. (५१ टक्के), उस २८२ पैकी ५४ हे. (१९ टक्के) यास कडधान्य ५३८५ हेक्टरपैकी ७८८ हेक्टर (१५ टक्के), अन्न द्रव्ये ७५५४ हेक्टर पैकी ८८९ हे.(१२ टक्के) अशा प्रकारे तालुक्यातील पेरणी युक्त २६ हजार ३४७ हेक्टर पैकी ८९२५ हेक्टर (३४ टक्के) क्षेत्रात खरीपाची पेरण्या पूर्ण झाल्या आहे.

Rain
RainRain


९१ मी.मी पावसाची नोंद
दरम्यान, २४ जून रोजी तालुक्यात ७६.६ मी.मी. पर्यंत तालुक्यात ९१.२९ मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com