esakal | दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई साठी दोन विशेष रेल्वेगाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई साठी दोन विशेष रेल्वेगाड्या

एलटीटी-हटिया एक्सप्रेसप्रमाणेच थांबे देण्यात आले आहे. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत.

दिवाळीनिमित्त पुणे, मुंबई साठी दोन विशेष रेल्वेगाड्या

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ : आगामी दिवाळी सणामुळे रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता पुणे-गोरखपूर व एलटीटी-हटीया दरम्यान, विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

वाचा- अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू !

लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया अतिरिक्त उत्सव विशेष गाडी
अप 08225 लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया अतिरिक्त उत्सव विशेष गाडी 14 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दर शनिवारी हटिया येथून 09.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसर्‍या दिवशी 1.35 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 08226 डाउन उत्सव गाडी 16 ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 12.15 वाजता सुटेल आणि हटीयाला दुसर्‍या दिवशी चार वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक व नियमित गाडी क्रमांक 12812/12811 एलटीटी-हटिया एक्सप्रेसप्रमाणेच थांबे देण्यात आले आहे. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत.


पुणे-गोरखपूर अतिरीक्त उत्सव गाडी 
डाऊन 02031 पुणे ते गोरखपूर ही गाडी 14 ते 21 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार व शनिवारी 4.15 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 10.30 वाजता गोरखपूर स्टेशनला पोहोचेल. अप 02032 गोरखपूर ते पुणे गाडी ही 16 ते 23 नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवार व सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 1.15 वाजता प्रस्थान करेल आणि दुसर्‍या दिवशी पुणे स्टेशनला 8.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाल, बिना, झांसी, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बस्ती या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, चार द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत. दरम्यान, केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/ प्रवास करण्याची परवानगी असलीतरी प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड कोविड 19 संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.  
 

loading image