esakal | अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू

कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन रात्री त्या परिसरातच थांबले होते. सकाळी दैनंदिन नियोजन करून बिलगाव येथील नदीत आंघोळीसाठी गेले असता त्याठिकाणी पाय घसरून ते पाण्यात पडले.

अभाविपचे राष्ट्रीय मंत्री ओव्हाळ यांचा नंदुरबारला नदीत बुडून मृत्यू

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ हे तालुक्यात धडगाव तालुक्यात संघटनात्मक कामासाठी दौऱ्यावर होते आज दुपारी बिलगाव येथे नदीत आंघोळ करत असताना पाण्यात बुडून त्यांच्या मृत्यू झाला याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

वाचा- दोंडाईचा येथील देशमुख गट पुन्हा राष्ट्रवादीत ! 
 

याबाबत मिळालेली माहिती अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई येथील राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ हे काल काल ( ता. 10) पासून नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते ते संघटनात्मक कामासाठी धडगाव तालुक्यात गेले होते. तेथील काही कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन रात्री त्या परिसरातच थांबले होते. सकाळी दैनंदिन नियोजन करून बिलगाव येथील नदीत आंघोळीसाठी गेले असता त्याठिकाणी पाय घसरून ते पाण्यात पडले त्यात नदीच्या खोल पाण्यात बुडून त्यांच्या मृत्यू झाला ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली.

मित्र, कार्यकर्त्यांनी वाचविण्याचा केला प्रयत्न

यावेळेस सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मात्र ओव्हाळ यांच्या मृत्यू झाला होता घटनेची माहिती धडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचले ओव्हाळ यांचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी  येथे गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत पुढील सोपस्कार पार पाडून त्यांचा मृतदेह मुंबईकडे रवाना करण्यात आला.

संपादन- भूषण श्रीखंडे