भुसावळःतापी नदीपात्रात तरुणाचा..तर खदाणीत मजुराचा बुडून मृत्यू

Bhusawal Drowning death News : नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.
Drowning
Drowning
Updated on



भुसावळ : भुसावळ शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (ता. २४) घडली. पहिल्या घटनेत तापी नदीपात्रात (Tapi River) तरुणाचा तर दुसऱ्या घटनेत मांडवादिगर (ता. भुसावळ) येथे खदाणीच्या पाण्यात मजुराचा (Laborer) बुडून मृत्यू (Drowning death) झाला आहे.

Drowning
जळगाव जिल्ह्यात भाजपला खिंडार; ११ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


शहरातील तापी नदीकाठालगत अंत्ययात्रा आली असता, मयतावर अंत्यविधी करण्यात आल्यानंतर काही जण तापी नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी उतरले. यावेळी नदीला जास्त पाणी असल्याने पात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने अजय राजू वानखेडे (वय. २४, रा. मुस्लीम कॉलनी) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावेळी नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.

Drowning
प्रत्येक घटकाशी राजकारणाचा टच असतो- छगन भुजबळ


खदानीत बुडून मजुराचा मृत्यू
भुसावळातील काही मजूर मांडवादिगर (ता. भुसावळ) गावातील रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामावर गेले होते. काम आटोपून घराकडे निघालेल्या गवंडी मजुरांनी जवळच असलेल्या खदाणीच्या पाण्यात हायपाय धुतले. यावेळी अब्दुल इब्राहिम शाह (वय २८, रा. दिनदयाल नगर, भुसावळ) यांचा खदानीत पाय घसरुन पाण्यात बुडून मृत्यू झाला. सहकारी मजुरांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली असून, घटनेची माहिती मिळताच येथिल नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंह) ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. व रुग्णवाहिकेतून मृतक अब्दुल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भुसावळात आणण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com