esakal | अजबगजब..चक्‍क रस्‍त्‍याला वाहिली श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

yawal damage road tribute

यावल रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती. संत गजानन महाराज मंदिरासमोर तर एकएक फुटाचे खड्डे पडले होते. बाहुप्रतिक्षेनंतर या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण चे काम फेब्रुवारी 2020 मध्ये झाले.

अजबगजब..चक्‍क रस्‍त्‍याला वाहिली श्रद्धांजली

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : शहरातील यावल रोडचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले. मात्र दहाच दिवसात रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाच निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होत असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जनाधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी रस्त्यास श्रद्धांजली वाहून अनोखे आंदोलन करण्यात आले.

यावल रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली होती. संत गजानन महाराज मंदिरासमोर तर एकएक फुटाचे खड्डे पडले होते. बाहुप्रतिक्षेनंतर या रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण चे काम फेब्रुवारी 2020 मध्ये झाले. रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत नागरिकांनी सभापती सचिन चौधरी तक्रार केली असता, प्रत्यक्षात जाऊन रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळेस डबर कामावर पिवळी माती पसरविण्याचे बोगस काम सुरू होते. व होत असलेले हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असल्याने शहरातील काही स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधीसमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुरेशी यांच्याकडे या रस्त्याच्या होत असलेल्या नित्कृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. परंतु या तक्रारीची कोणतीही दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली नाही व त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. 

रहिवाशांना नाहक त्रास
नंतर लॉकडाऊन च्या काळात या रस्त्यावर कुठलीही वाहतूक नव्हती. या रस्त्याचे डांबरीकरण चे काम जुलै 2020 च्या अखेरीस पूर्ण झाले. परंतु दहा दिवसातच या रस्त्यावर भले मोठे मोठे गड्डे पडले. आज या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमुळे शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील त्यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी या वेळी नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर, अशोक चौधरी, सचिन पाटील, तम्मा पैलवान, निखिल भालेराव, गोकुळ राजपूत, तुषार चौधरी, प्रवीण भंगाळे, सादिक खान, रोहित वानखेडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
या रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होणे नित्याचीच बाब झालेली आहे. 10 दिवसातच रस्ता खराब झाल्याने या रस्त्याचे काम योग्य ती चौकशी व्हावी. यात दोषी संबंधित ठेकेदार यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. तसेच संबंधित ठेकेदार व नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी, पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


संपादन ः राजेश सोनवणे