esakal | अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'
sakal

बोलून बातमी शोधा

अरेच्चा :  92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

तरुणांचे अनेक युथ आयकाँन असतात. परंतु जामठीतील व्यायाम करणार्या तरुणांचे धनुकाका हेच 'आयकाँन'ठरले आहे.

अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

sakal_logo
By
सचिन महाजन

बोदवड ः तालुक्यातील जामठी येथील माजी सरपंच धनसिंग गणु पाटील हे गावातील राजकीय विकासकामांच्या माध्यमातून अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर आपली राजकीय छाप टाकली.  अनेक वर्षे सरपंच पद भुषवित गावावर आपला दबदबा निर्माण करीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले नाव अग्रस्थानी ठेवले आहे.

वाचा- आईला भेटण्यासाठी येत असताना अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्‍यू 

अवघ्या 92 वर्षाचा व्यक्ती 'तरुण' असल्यागत आजच्या तरुणाईला लाजवेल असा उत्साह आणि प्रचंड इच्छा शक्ती च्या जोरावर आजही मन आणि शरीर जोपासण्याचे काम करणाऱ्या धनसिंग काकांनी तरुणांना व्यायामाचे धडे देण्याचा छंद अंगिकारला आहे.हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य संवर्धनासाठी व्यायामाचे 'फँड'आज प्रत्येकजणात दिसुन येते.परंतु गेले अनेक वर्षे सातत्याने व्यायाम करून आपले मन व शरीर ताजे आणि तरुण ठेवण्याचे काम 92 वर्षाचे धनसिंग काका करीत आहे.

जामठी येथील ग्रामपंचायतीने तरुणांसाठी व्यायाम करण्यासाठी भव्य अशी व्यायाम शाळा साहित्यासह उपलब्ध करुन दिली आहे.तरुणांचे अनेक युथ आयकाँन असतात. परंतु जामठीतील व्यायाम करणार्या तरुणांचे धनुकाका हेच 'आयकाँन'ठरले आहे.

सकाळी व्यायाम करणाऱ्या तरुणांना पहाटे चार वाजताच उठुन सिंगल बार,डबल बार,दगडी गोट्या उचलणे, मुदगल फिरवणे यासारख्या अत्यंत पुरातन आणि शास्रोक्त व्यायामाचे प्रकार शिकवण्यात धनुकाका तरबेज आहेत.त्यांच्या या विशेष प्राविण्याचा लाभ घेण्यासाठी शरीर यष्टी कमावणारे तरुण हिरीरीने पुढे येत आहेत.

वाचा-  न थांबता ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पोहून पार 
 

अठराव्या वर्षापासून व्यायामाला सुरुवात

जामठी येथे जन्म झालेल्या धनसिंग गणु पाटील यांनी वयाच्या अठराव्या वर्षापासून व्यायामाला सुरवात केली.त्यानंतर त्यांनी आपली राजकीय कारकीर्द गाजवत जामठीचे सरपंच पद भुषवत ते आजही गावातील तरुणांनी व्यायामाचे धडे देत तरुणांच्या मनातील 'आयडाँल'ठरले आहेत. 


संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top