esakal | खडकीफाटा ते दहीवद रस्ता झाला 'डेंजर' झोन; आता पर्यंत पंधरा जणांचा गेलाय जीव !  
sakal

बोलून बातमी शोधा

खडकीफाटा ते दहीवद रस्ता झाला 'डेंजर' झोन; आता पर्यंत पंधरा जणांचा गेलाय जीव !  

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या ठिकाणांचे निरिक्षण करुन वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत आसतात.एखादा अपघात झाला की तेवढ्या पुरती तेवढी यंत्रणा हलते व कार्यवाही होते.

खडकीफाटा ते दहीवद रस्ता झाला 'डेंजर' झोन; आता पर्यंत पंधरा जणांचा गेलाय जीव !  

sakal_logo
By
दीपक कच्छवा

मेहुणबारे :  मेहुणबारे ते दहीवदफाटा दरम्यान असलेल्या खराब रसत्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तीन वर्षात १५ मयत झाले असल्याची नोंद झाली असुन या अपघातात आठ गंभीर आपघात देखील घडले आहेत.यातील सर्वाधिक आपघात दहीवद ते खडकीफाटा दरम्यान झाले आहे.या झालेल्या आपघातांना रस्त्यावरील खड्डे कारणीभूत ठरल्याचे चित्र दिसत  आहे. 

धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211वरील धुळे ते चाळीसगाव दरम्यान रस्त्याची भयंकर दुर्दशा झाली आहे. जागोजागी जीवघेणे खड्डे असल्याने हे खड्डे वाचविण्याच्या नादात अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उलटून मोठ्या प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होत आहे.हा मार्ग चौपदरीकरणासाठी प्रस्तावित आहे. मात्र रस्त्याची निविदा निघत नसल्याने चौपदरीकरणाचे काम रखडले आहे.  परिणामी रस्त्याच्या डागडुजी पाहीजे तशी चांगली  केली जात नाही. या रस्त्याची वाट लागली असतांना देखील खड्डे बुजवतांना देखील पुरेशी खबरदारी घेतली जात नाही.

खडकीफाटा ते दहीवद 'डेंजर' झोन

धुळे-चाळीसगाव महामार्ग हा दिवसेंदिवस घातक ठरत आहे.या मार्गावर अपघात होण्याचे नित्याचे झाले आहे.नुकताच भोरस फाट्याजवळ दुचाकीवरून जाणारे करगाव येथील पिता- पुत्र ट्रकच्या धडकेत ठार झाले होते. खडकीसीम- दहीवद चिंचगव्हाण फाटा अपघाताच्या दृष्टीने अत्यंत 'डेंजर' झोन ठरलाआहे.या गावांदरम्यान गेल्या तीन वर्षात १५ च्या वरती मयत झाले आहेत. 

जनजागृतीचा पुरता अभाव 

वाहने चालवतांना हेल्मेट वापरणे कसे फायद्याचे आहे, वाहतुकीचे नियम काय आहेत व ते कसे पाळले पाहीजे याबाबत कुठलीच जनजागृती होतांना दिसत नाही. यामुळे  वाहनधारक बेफिकीर होऊन वाहने चालवत आसतात.
वास्तविक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या ठिकाणांचे निरिक्षण करुन वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत आसतात.एखादा अपघात झाला की तेवढ्या पुरती तेवढी यंत्रणा हलते व कार्यवाही होते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या असा कारभार चालतो.याबाबत वेळीच उपाययोजना होण्याची गरज आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे