esakal | चाळीसगाव-धुळे महामार्गावर धुळीचे ढग; अंदाज येत नसल्याने होताय अपघात !
sakal

बोलून बातमी शोधा

चाळीसगाव-धुळे महामार्गावर धुळीचे ढग; अंदाज येत नसल्याने होताय अपघात !

खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरुम भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने हवेत उडत आहे. हवेत उडणाऱ्या या मातीचा दुचाकी चालकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.

चाळीसगाव-धुळे महामार्गावर धुळीचे ढग; अंदाज येत नसल्याने होताय अपघात !

sakal_logo
By
दीपक कच्छाव


मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव -धुळे महामार्गाची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे.यापुर्वी ह्या रसत्याच्या खड्डे बुजविण्याची कामे दोन वेळा  झाली आहे.अनेक वेळा काम झाले मात्र हे सर्व कामे वरवर केली आहेत. या रसत्याची खुपच वाईट परिस्थिती झाली आहे.या रस्त्यावरील बहुतांश खड्यातील वरच्यावर टाकलेला मातीमिश्रीत मुरुम वाहणाच्या वेगाने भुरकंन हवेत उडुन गेला असल्याचे चित्र सध्या येथील रसत्यावर दिसत आहे.

चाळीसगाव -धळे रस्ता अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खंड्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने मातीमिश्रीत मुरुम टाकुन गांधीगिरी केली आहे. या खड्ड्यांमधील मातीमिश्रीत मुरुम भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाने हवेत उडत आहे. हवेत उडणाऱ्या या मातीचा दुचाकी चालकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे. मातीमिश्रीत मुरुम डोळ्यात गेल्यानंतर अपघात होण्याची शक्यता असते यामुळे या रसत्याची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न प्रत्येक वाहन चालक उपस्थित करत आहे.या रसत्याची तीन वर्षात अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. 

खड्यांचा अंदाज येत नाही

चाळीसगाव-धुळे महामार्ग क्रमांक २११ वरील चाळीसगाव ते धुळे पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याच्या खाली वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.या रस्त्यावर गिरणा पुलाच्या पुढे मोठ मोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांचा चालकांना अंदाजच येत नाही.या भागातील सर्वच लोकप्रतिनिधी प्रचारासाठी दंग आहेत. त्यांना हा रस्ता दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कामांची चौकशीची मागणी 

चाळीसगाव धुळे रस्ता दोन वर्षात  ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या कामाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.चाळीसगाव तालुक्यात बहुतांश रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे. जागोजागी लहान मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हे सर्व रस्ते खराब होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व भरभक्कम अशी रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे


 

loading image