पत्‍नीला म्‍हणाला पैसे घेवून येतो; गेला तो आलाच नाही

दीपक कच्छवा
Sunday, 18 October 2020

दवाखान्याचे बील भरण्यासाठी पैसे घेऊन येतो असे पत्नीला सांगून तो शुक्रवारी (ता. १६) घरातुन गेला; तो परत आलाच नाही.

मेहुणबारे (जळगाव) : गणेशपुर (ता.चाळीसगाव) येथील तरुण शेतकऱ्यांने जास्तीच्या पावसामुळे नापिकी झालेले पिक शेतीचे कर्ज व नातेवाईक, मित्र परिवाराकडून घेतलेले हात ऊसणवारी पैसे आणि पत्नीच्या दीर्घ आजारांच्या उपचाराच्या खर्चाला वैतागुन या शेतकऱ्यांने जीवनयात्रा संपवली.
गणेशपूर (ता.चाळीसगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी सुनील भिका पाटील (वय ३८) या शेतकऱ्यांने शेतातील नापीकी व कर्जापोटी नातेवाईक यांच्याकडून हात ऊसणवारीने पैसे घेतले होते. पत्नीच्या दीर्घ आजाराच्या उपचारासाठी लागणारा खर्च यात सुरु असलेल्या पत्नीच्या खाजगी रूग्णालयात लागणारे पैसे हे हातात नसल्याने तो व्यतीत झाला होता. 

पैसे घेऊन येतो असे सांगुन गेला
शेतकरी सुनील पाटील हा मोठ्या चिंतेत होता. दवाखान्याचे बील भरण्यासाठी पैसे घेऊन येतो असे पत्नीला सांगून तो शुक्रवारी (ता. १६) घरातुन गेला; तो परत आलाच नाही. औरंगाबाद–  धुळे बायपास रेल्वे पुलाजवळ शनिवारी (ता.१७) रात्री तीनच्या सुमारास रेल्वेखाली झोकून आत्महत्या करून जीवन संपवले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon farmer suicide in railway track