esakal | तीन महिन्यापासून उसाच्या पेमेंटसाठी शेतकरी ताटकळत !
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

तीन महिन्यापासून उसाच्या पेमेंटसाठी शेतकरी ताटकळत !

sakal_logo
By
दिपक कच्छाव

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांनी रावळगाव शुगर फँक्टरीला उस दिला होता. मात्र तीन महिने होवून देखील शेतकऱ्यांना उसाची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी हवालदील झाले असून त्यांनी याबाबत नुकतेच पळासरे (ता.चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे उसाचे पेमेंट मिळत नसल्याबाबत तक्रार केली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रावळगाव शुगर फॅक्टरीला तीन महिन्यापूर्वी उस दिला होता.उसतोडणीपूर्वी कारखान्याचे कर्मचार्याने उस तोडणी झाल्यानंतर एक ते दीड महिन्यानंत पैसे मिळतील असे सांगितले होते.त्यांच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी उस दिला. त्यानंतर मात्र उसाचे पेमेंट मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्याचे सदर कर्मचारी, एमडी,शेतकी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला परंतु उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याचा आरोप पळासरे येथील शेतकरी बाळासाहेब देवकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असेही देवकर यांचे म्हणणे आहे.

खरीप हंगामासाठी पैशाची गरज

उसतोडणीनंतर केवळ एक ते दीड महिन्यात पैसे मिळतात. मात्र पळासरे येथील शेतकऱ्यांना तीन महिन्यापासून उसाचे पेमेंट मिळाले नाही.पैसे न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.पावसाळा तोंडावर आला आहे. खरीप हंगामासाठी पैशाची गरज असणार आहे.रावळगाव शुगर फॅक्टरीने उसाचे पेमेंट त्वरीत द्यावे यासाठी तहसीलदार यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उसाचे थकीत पेमेंट न मिळाल्यास शेतकऱ्यांचे काही बरे वाईट झाल्यास कारखान्याशी संबंधीत जबाबदार राहतील असा इशाराही श्री देवकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image