
विवाहितेच्या पतीचा आतेभाऊ असलेल्या कृष्णाराव दिलीपराव भोसले (वय 30) याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्य घरी नसतांना घरात प्रवेश केला. यानंतर त्याने विवाहीतेशी हात पकडून अंगलट करण्याचा प्रयत्न केला.
मेहुणबारे (जळगाव) : पतीचा आतेभाऊ असलेल्या इसमाने गेल्या दोन वर्षापासून 26 वर्षीय विवाहितेला धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. संबंध ठेवले नाही तर बिंग भोडून पतीपासून घटस्फोट घ्यायला लावेल; अशी धमकी देवून शारीरीक अत्याचार केला. यासोबतच एक लाख रूपये व सोन्याचे दागिने उकळले.
भवाळी (ता.चाळीसगाव) येथील पीडित 26 वर्षीय विवाहितेच्या पतीचा आतेभाऊ असलेल्या कृष्णाराव दिलीपराव भोसले (वय 30) याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्य घरी नसतांना घरात प्रवेश केला. यानंतर त्याने विवाहीतेशी हात पकडून अंगलट करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने याला विरोध केला असता कृष्णकुमार याने तुझा पती माझा चांगला मित्र असून तु याबाबत वाच्यता केली; तर तुझ्या पतीला तुझ्याशी घटस्फोट घ्यायला लावेल अशी धमकी दिली.
ती असह्य म्हणून सोसले
सासू- सासरे वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांना धक्का पोहचेल या भितीपोटी विवाहितेने कृष्णकुमार याचा त्रास सहन केला. त्यातच कृष्णकुमार याने मला पैशाची गरज आहे. घरातील शेतीचे व्यवहाराचे पैसे तुझ्याजवळ असल्याने माझ्या पैशाची गरज भागव. मी तुझी बदनामी करणार नाही, असे धमकावत विवाहितेकडून वेळोवेळी पैसे घेत एकूण एक लाख 2 हजार 500 रूपये उकळले. तसेच मुलांना ठार मारण्याची धमकी देवून घरातील सासु व नणंद यांचे असलेले सोन्याचे दागिनेही कृष्णकुमार याने धमकावून वेळोवेळी घेतले.
गुन्हा दाखल
कृष्णकुमार हा 6 डीसेंबरला पुन्हा विवाहितेच्या घरी गेला व महिलेशी अंगलट करू लागला. त्यावेळी तिने विरोध केला असता कृष्णकुमारने विवाहीतेचा हात पिळत मी संसाराची वाट लावीन अशी धमकी देवून निघून गेला. दरम्यान 9 डिसेंबरला नणंद नातेवाईकाकडील लग्नानिमित्त घरी आली असता तिने लग्नात जायचे असल्याचे विवाहितेकडील अंगठी व लॉकेट मागितले. मात्र विवाहीतेने दागिने कृष्णकमारला दिले असल्याने नणंदेला काय सांगावे हेच सुचत नव्हते. तब्बल दोन वर्षे विवाहितेने कृष्णकुमारकडून होणारा अत्याचार सहन केला; अखेर मनाचा पक्का विचार करून विवाहीतेने पती, सासु, सासरा ही आपबित्ती सांगितली. यानंतर तिने विवाहितेने फिर्याद दिल्यावरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला संशयित कृष्णकुमार भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे