प्रसुतीसाठी पत्‍नीला घरी नेताना काळाची झडप; कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू

प्रसुतीसाठी पत्‍नीला घरी नेताना काळाची झडप; कुटुंबातील तिघांचा मृत्‍यू
car accident
car accidentcar accident
Updated on

मेहुणबारे (जळगाव) : चाळीसगाव- नांदगाव रस्त्यावरील रोहिणी ते तळेगाव दरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाला. मृतात वाघडू (ता. चाळीसगाव) गावातील एक तर तांदुळवाडी (ता. कन्नड) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. यात गर्भवती महिलेसह दोन पुरूष व नऊ वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. या अपघातात दोन वर्षाचा मुलगा व कार चालकही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. (chalisgaon-nandgaon-road-car-bike-accident-three-family-member-death)

car accident
सावधान..‘बीएसएनएल’च्‍या नावाने येवू शकतो फोन; एकाला साठ हजाराचा गंडा

नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येत असलेले कार (क्र. एमएच ०२ डीजे ७१३४) ने समोरून येणाऱ्या मोटर सायकल (क्र. एम.एच. ०२ ईडी ६४७६) ला समोरून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात मोटरसायकलचा पूर्णपणे चेंदा झाला. तर कारचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले असून यात २ पुरुष, एक महिला आणि बालिकेचा समावेश असून अन्य २ वर्षांचा बालक गंभीर जखमी झाला आहे. अपघात दुपारी बाराच्या सुमारास चाळीसगाव– नांदगाव रस्त्यावर घडला.

प्रसुतीसाठी सोडत होते घरी

अपघातात मोटारसायकलवरून विलास मोरे व त्याच्या परिवाराला त्याच्या मूळ गावी तांदुळवाडी (ता. कन्नड) येथे पत्नीला डिलीव्हरीकरीता घरी सोडवयास जात असताना भगवान नागराज पाटील (वय ३६, रा.वाघडू ता.चाळीसगाव), सालदार विलास वसंत मोरे (वय ४०) त्याची पत्नी कल्पना मोरे (वय ३६), मुलगी रेणुका (वय ३) अशी सर्व जण जागीच ठार झाली आहेत. तर २ वर्षांचा चिमूरडा अमोल मोरे अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी धुळे येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

car accident
लसीकरणापासून बेघर, निराधार वंचितच

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तांदुळवाडी (ता.कन्नड) येथील विलास मोरे त्याची पत्नी कल्पना मोरे, मुलगी रेणुका हे सर्व एकाच कुटुंबातील होते. विलास मोरे हा सालदारकीचे काम करुन कुटंब चालवत होता. मात्र भिषण आपघातात पती– पत्नी व मुलगी ठार झाले. तर मुलाचीही परीस्थिती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच एकच आक्रोश झाला होता.

बाळाची प्रकृती चिंताजनक

आपघातात गंभीर जखमी झालेल्या २ वर्षाचा अमोलला कळत देखील नाही. आपले आई, वडील आणि बहीण आपल्‍याला सोडून गेले. या बालकाला उपचारासाठी धुळे येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक संपत आहेर, हवालदार भालचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com