अपघात झाला ते ठिकाण आणि वेळ सारखीच पण

बापू शिंदे
Thursday, 10 September 2020

दोन महिन्यात दोन किमीच्या अंतरात दोन तरुण मोटारसायकलस्वारांना जिव गमवावे लागले. एक खडकी येथील तर दुसरा बिलाखेड येथील तरुण होता. यातच बुधवारी रात्री पुन्हा एक दिवस उलटत नाही; तोवर तिसरा अपघात झाला.

तरवाडे (जळगाव) : बिलाखेड (ता.चाळीसगाव) येथे बुधवारी पुन्हा मका घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने चालक बचावला असून नागरिकांच्या मदतीने चालक वाचवण्यात यश आले. ठेकेदाराच्या चुकीमुळे तिसरा अपघात झाल्याने वाहनधारकांचा तिव्र संताप व्यक्त होत होता.

दोन महिन्यात दोन किमीच्या अंतरात दोन तरुण मोटारसायकलस्वारांना जिव गमवावे लागले. एक खडकी येथील तर दुसरा बिलाखेड येथील तरुण होता. यातच बुधवारी रात्री पुन्हा एक दिवस उलटत नाही; तोवर तिसरा अपघात झाला. सोमवारी झालेल्या जागेपासून दोनशे मिटर अंतरावर मका भरलेला ट्रक (क्र. एमएच ४१ जी ६२९०) हा मालेगावकडून चाळीसगावकडे येत असतांना बिलाखेड येथील पियाजो शोरुमजवळ रात्री साडेआठच्या सुमारास समोरुन येणाऱ्या ट्रकमुळे त्याला साईड देतांना अपघात झाला. ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु केल्याने पर्यायी बनवलेल्या रस्त्याच्या कडा ढासळल्याने ट्रक पलटी झाल्याने अपघात झाला. 

चालक बचावला
फक्त ठेकेदाराच्या हलगर्पजीणामुळे हा अपघात झाला यात ट्रक चालक मुफ्तार खान ईब्राईमखान याला पलटी झालेल्या ट्रकमधून बापू शिंदे व वाहनधारकांच्या मदतीने तात्काळ बाहेर काढले यामुळे चालकाचे प्राण वाचले. यावेळी रस्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. ठेकेदाराचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी आले. मात्र वाहनधारक व बिलाखेडचे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप होतांना काहीसे वादही झाले याबाबत पोलीसांनाही कळवण्यात आले होते मात्र रात्री उशिरा वाद मिटल्याने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना यापुढे अपघात होऊ नये याबाबत खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon road accident night same place and time