पुल हलू लागला, व्हिडीओ झाला व्हायरल अन उडाली धांदल, सत्य समोर आले मग झाले सर्व निश्चींत !

पुल हलू लागला, व्हिडीओ झाला व्हायरल अन उडाली धांदल, सत्य समोर आले मग झाले सर्व निश्चींत !
Updated on

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील मेहुणबारे येथील गिरणा नदीवरील पूल हलू लागल्याचा व्हिडीओ आज शुक्रवारी सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.मात्र हा व्हिडीओ गिरणा पुलाचा नसून तो चोपडा तालुक्यातील गिरणा नदीवरील पुलाचा असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मेहूणबारेतील गिरणेचा पुल हलू लागल्याची अफवा ही सोशल मीडियावर पसरल्याने चाळीसगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावरील या अतिरेकपणामुळे नाहक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान मेहूणबारे येथील गिरणा पुल सुस्थितीत असून नुकतीच या पुलाची डागडुजी केली असून पुलाला कुठलाही धोका नसल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग च्या धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
धुळे चाळीसगाव मार्गावर मेहूबणारे येथे गिरणा नदीवर सन 1970 साली पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाला नुकतेच 50 वर्ष पूर्ण झाले. या पुलाची उंची नदी पात्रापासुन सुमारे तेरा मीटर उंच आहे.या पुलाचे अँगल देखील खालून कमकुवत झाले असून उघडे देखील पडले होते. त्यामुळे मध्यंतरी या पुलाच्या उघड्या पडलेल्या अॅगंलची थातूरमातूर डागडुजी करण्यात आली आहे. मात्र हा पुल झाल्यापासुन ते आज पर्यंत कुठलीच पाहिजे तशी दुरूस्ती झालेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पुलावर थातूरमातूर डांबरी करण करून तेवढी बोळवण केली जाते.काही दिवसांनी हे खड्डे जैसे थे होतात. सोशल मीडियावरील व्हिडीओने खळबळ उडाली होती.

व्हिडीओने उडाली खळबळ

मेहूणबारे जवळील गिरणा पुल हलू लागल्याचा व्हिडीओ आज शुक्रवार सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होवू लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली.वाहनधारकांसह नागरीकांमध्ये धडकी भरली.या व्हीडीयोची सत्यता पडताळून पाहीली आसता हा व्हिडीओ मेहूणबारे गिरणा पुलाचा नाही तर चोपडा तालुक्यातील गुळ नदीवरील पुलाचा असल्याचे समोर येताच अनेकांनी सुस्कारा सोडला. सध्या सोशल मीडियावर एखाद्या व्हिडीओ व मजकुराने कशी फसवणूक होते आणि चुकीचा संदेश पोहचतो हे यानिमीत्ताने दिसून आले.

अधिकार्यांनी दिला दुजोरा

चाळीसगाव- धळे  राष्ट्रीय माहामार्ग प्राधिकरणाच्या धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या पुलाचे डागडुजीचे काम नुकतेच करण्यात आले. पुलाच्या दोन्ही बाजुने गवत काढून पुलावर साचलेले पाणी काढण्यासाठी असलेले होल मोकळे केले.  हा पुल सुस्थितीत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो गिरणा पुलाचा नाही.
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com