वाळूमाफियांची दादागिरी; तलाठ्याला धक्काबुक्की करून जप्त ट्रॅक्टर पळविले

वाळूमाफियांची दादागिरी; तलाठ्याला धक्काबुक्की करून जप्त ट्रॅक्टर पळविले
Updated on

चाळीसगाव : अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडले. कारवाईसाठी तहसील कार्यालयात ते घेऊन जात असताना चालकाने तलाठी व कोतवाल यांना धक्काबुक्की करून वाळूसह डंपर पळवून नेले. हा प्रकार शहरातील खरजई रस्त्यावरील हॉटेल संगमच्या मागे मंगळवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. या प्रकरणी तलाठ्याच्या फिर्यादीवरून डंपरचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धरणगाव सजाचे तलाठी विजय खंडू माने व टाकळी प्र. चा.चे कोतवाल छोटू सुकलाल गांगुर्डे हे तहसीलदारांच्या आदेशान्वये तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गस्त घालत असताना मंगळवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास टाकळी प्र. चा. भागातील खरजई रस्त्यावरील साई संगम हॉटेलच्या मागे अशोकरत्न बिल्डकॉन बोर्डाजवळ डंपर (एमएच १९, झेड ५६६५) अवैधरीत्या वाळूने (गौण खनिज) भरलेला दिसला. डंपरमध्ये सुमारे तीन ब्रास वाळू होती. तलाठी माने व कोतवाल गांगुर्डे यांनी चालकास आपली ओळख दिल्यानंतर डंपरचा फोटो काढला. चालकाला नाव विचारले असता, त्याने नाव सांगितले नाही. वाळू वाहतुकीचा परवाना आहे काय? अशी विचारणा तलाठी माने यांनी डंपरचालकास केली असता त्याने नसल्याचे सांगितले. माने व कोतवाल यांनी चालकास डंपर तहसील कार्यालयात घेऊन चल, असे सांगितले असता, त्याने तलाठी माने यांच्याशी अरेरावी करून त्यांना धक्काबुक्की केली व ‘तुला काय करायचे ते करा, मी कोणाला घाबरत नाही’, असे सांगून वाळूने भरलेला डंपर घेऊन पळू लागला. पथकाने हा डंपर थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने तो भडगाव रस्त्याकडे वेगाने चालवून पळ काढला. 

तलाठी माने यांनी हा प्रकार नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना सांगितला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी विजय माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालकाने गौण खनिज वाहतुकीसंबंधी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणून अरेरावी करून धक्काबुक्की करून डंपर पळवून नेल्याप्रकरणी चालकाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

वाळूमाफियांची दादागिरी वाढली 
दरम्यान, तालुक्यात गिरणा नदीपात्रातून भरपावसाळ्यातही राजरोसपणे अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे. यापूर्वी महसूल विभागाच्या पथकांनी अनेक कारवाया करूनदेखील माफिया जुमानेसे झाले आहेत. २६ ऑगस्टला रहिपुरी शिवारात महसूल पथक वाळूचोरी रोखण्यासाठी गस्त घालत असताना तीन ट्रॅक्टर पकडले होते. या वेळी वाळूमाफियांनी महसूल पथकाशी अरेरावी करीत अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पळवून नेले होते. मात्र, पुन्हा काही वेळाने हे ट्रॅक्टर जागेवर आणून सोडले होते. तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरश: धुडगूस घातला असून, वाळूचोरी रोखणाऱ्या दैनंदिन गस्ती पथकालाही हे माफिया जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Girna Dam Water Storage
Ganesh Idol Broken News
Jalgaon flyover collapse contractor FIR
Jalgaon bypass one way traffic
Marathi News Esakal
www.esakal.com