पाहुणी आलेल्‍या सालीवर मेहूण्याचा आत्याचार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

प्रकार शंकर याच्या पत्नीस समजताच तिने त्याला खडसावले असता शंकरने दोघी बहिणींना जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही जर कुणाला सांगितले तर तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी दिली.

मेहुणबारे (जळगाव): मोठ्या बहिणीकडे आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बहिणीवरच तिच्या पतीने अमानुष आत्याचार करून याची वाच्याता कुठे केली तर तुम्हा दोघांना मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील शिवकॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात आत्याचाराचा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
  
शहरातील शिवकॉलनी परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय महिलेकडे शिर्डी (जि. अहमदनगर) येथील 14 वर्षीय बहिण राहत होती. बुधवारी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान पीडित 14 वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना तिचा मेहूणा शंकर चौधरी उर्फ रहीम नज्जु पठाण याने बालिकेला घराबाहेर बोलावून तिच्यावर आत्याचार केला. हा प्रकार शंकर याच्या पत्नीस समजताच तिने त्याला खडसावले असता शंकरने दोघी बहिणींना जातीवाचक शिवीगाळ करून तुम्ही जर कुणाला सांगितले तर तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी दिली.

गुन्हा दाखल
याप्रकरणी पीडित बालिकेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून शंकर रविंद्र चौधरी उर्फ रहीम नज्जु पठाण याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 376(2)(फ), 504,506, बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे 5(एन),6,10, अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3(1)(आर) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon sister in low toucher