esakal | पूराच्या पाण्यात पुल वाहून गेला; चांभार्डी ते वाघळीचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

Bridge Broken

पूराच्या पाण्यात पुल वाहून गेला; चांभार्डी ते वाघळीचा संपर्क तुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव ः तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तितूर नदीला पूर (Titur River Flood) आल्याने पुराच्या पाण्यात वाघळी (ता. चाळीसगाव) गावातील चांभार्डी गावाकडे जाणारा पूल वाहून (Bridge Broken) गेला. त्यामुळे दोन्ही गावांचा सध्या संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पुराच्या पाण्याचा फटका नदीलगतच्या शेतांनाही (Farm) बसला आहे. या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन चांभार्डीवासीयांसाठी महत्त्वाचा असलेला हा पूल तातडीने उभारावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: ब्रेकिंगः जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये ६ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला

वाघळी गावातून चांभार्डी गावाकडे जाण्यासाठी यापूर्वी रस्ता नव्हता. त्यामुळे नदीपात्रातून ग्रामस्थांना जावे लागत होते. सुमारे चार वर्षांपूर्वी नदीपात्रात पूल उभारण्यात आला. तितूर नदीला सोमवारी आलेल्या पुराचा जोर एवढा होता, की पाण्याच्या प्रवाहात संपूर्ण पूलच वाहून गेला. या पुलाच्या पलीकडच्या भागात वाघळी गावातील सुमारे दोनशे घरांची इंदिरानगर वस्ती वसली आहे. पूल वाहून गेल्यामुळे चांभार्डीकरांसह वस्तीतील रहिवाशांचा संपर्क तुटला आहे. परिणामी, ग्रामस्थांना चार किलोमीटरच्या फेरा पडत आहे. पुलाच्या पलीकडे वाघळीतील बऱ्याच शेतकऱ्यांची शेती असून त्यांची गुरेही शेतातच आहेत. पुल तुटल्याने आज सकाळी शेतकर्यांना शेतातच जाता आले नाही. त्यामुळे वाघळी गावात दररोज आणले जाणारे दूध आणता आले नाही. पुराच्या पाण्याचा जोर इतका तीव्र होता, की ज्यामुळे पुलासह पुलाचा भरावही वाहून गेला. पुराचे पाणी नदीपात्रालगतच्या शेतात शिरल्याने बर्याच शेतकर्यांच्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले. आजही शेतातील पाणी कमी झालेले नव्हते. कपाशीचे पीक मुळासह वर येऊन जमीनदोस्त झाले होते. या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी ‘एमपीएससी’ परिक्षा देणार

वाघळीतही नुकसान
वाघळी गावातील धनगर समाज मंगल कार्यालयाची संरक्षण भिंतही पाण्याच्या प्रवाहात तुटली. तितूर नदीकिनारी असलेल्या सुमारे १५ घरांमध्ये नदीचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे घरातील सर्व साहित्यांचे नुकसान झाले. ही घरे सिमेंट काँक्रिटची असल्याने वाचली, मातीची राहिली असती तर आणखीन मोठे नुकसान झाले असते. पिडीतांसाठी गिरीश बर्हाटे यांनी गावातील दत्त मंदिरात जेवणाची सोय केली होती. गावातील स्मशानभूमीलगतच्या संरक्षण भिंतीचे अतोनात नुकसान झाले.

loading image
go to top