esakal | जळगाव जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी ‘एमपीएससी’ परिक्षा देणार
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

जळगाव जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी ‘एमपीएससी’ परिक्षा देणार

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एम.पी.एस.सी) (MPSC Exam) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-२०२० (Pre-examination) येत्या शनिवारी (ता.४ सप्टेंबर) होणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत शहरातील ३५ उपकेंद्रांवर होणाऱ्या परिक्षेसाठी जिल्ह्यातून ११ हजार ४६३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परिक्षा घेण्यासाठी १ हजार १३० अधिकारी/कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षेसाठी विहित उपकेंद्रावर (Substation) परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील (Deputy Collector Rahul Patil) यांनी दिली.

हेही वाचा: शहादा तालुक्यात जोरदार पाऊस..पिकांना मिळाले जीवदानपरीक्षार्थीने परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र (डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणणे सक्तीचे आहे. विषयांकित परीक्षा यापुर्वी रविवार ११ एप्रिल, २०२१ रोजी घेण्याचे नियोजित होते. त्यानुसार सदर परीक्षेचे प्रवेशासाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, उपलब्ध करुन देण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र प्रस्तावित ४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

हेही वाचा: भुसावळची केळी इराणला रवाना..८०० क्विंटल मालाची काढणीहे आहेत नियम..
- परिर्क्षीची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी होणार
- परिक्षार्थीच्या ओळखीचा पुरावा आवश्‍यक आहे.
- स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोनला बंदी
- पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर वापरास बंदी

हेही वाचा: वाहन लुटणारी आंतरराज्य टोळी जेरबंद..धुळे पोलिसांची कामगिरी


तर स्वतंत्र व्यवस्था
ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या परिर्क्षीची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच उमेदवार यांनी आरोग्यसेतू ॲप डाऊनलोड करण्यात यावे.

loading image
go to top