esakal | वाळू माफियांचे धाबे दणाणले; इन्स्पेक्टर उतरले नदीपात्रात !

बोलून बातमी शोधा

sand

वाळू माफियांचे धाबे दणाणले; इन्स्पेक्टर उतरले नदीपात्रात !

sakal_logo
By
दिपक कच्छाव

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): मेहूणबारे शिवारात गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या वाळू चोरीच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले हे नदीपात्रात रात्रीच्या किर्र अंधारात उतरले. त्यामुळे वाळू माफियांना धडकी भरली आहे. गेल्या दोन दिवसात जामदा येथून दोन तर मेहूणबारे येथून एक ओमनी वाळूची अवैधरित्या चोरी करतांना पकडली तर उंबरखेड येथून 6 बैलगाड्या पकडल्या. ही वाहने जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी तहसीलदार यांच्याकडे तसा अहवाल पाठवला. या कारवाया सुरूच राहतील असे श्री देसले यांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO:धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले हे वाळू चोरांच्या विरोधात कारवाईसाठी अंधाऱ्या रात्री गिरणा नदीपात्रात उतरले. त्यांच्या समवेत हवालदार मिलींद शिंदे, सिद्धांत सिसोदे,गोरख चकोर, शैलेश माळी, गफ्फार शेख यांचा समावेश होता. रात्री 9.30 वाजेपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांनी गिरणा परीसर पिंजुन काढला. रात्रभर त्यांनी गिरणा पात्रात ठाण मांडले होते. शुक्रवारची रात्रही त्यांनी गिरणा पात्रात धाव घेत परिसर पिंजून काढला. त्यामुळे वाळू माफियांना पळता भुई झाली.

हेही वाचा: आजारी व्यक्तींनी घरी थांबू नका..वेळीच तपासणी करा !

गिरणा नदीपात्रातून कुणी अवैधरित्या वाहनातुन वाळू वाहतुक करीत असेल त्याबाबतची माहिती दिल्यास नक्कीच कारवाई करण्यात येईल असे देसले यांनी सांगितले. देसले यांच्यासह सहकाऱ्यांनी सलग दोन दिवस गिरणा नदी परिसर पिंजुन काढल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. विना क्रमांकाची वाहने गिरणा नदीपात्रातून वाळू वाहतुकीसाठी विना क्रमांकाच्या ओमनी मारूती कारचा वापर केला जात आहे. कुठलेही कागदपत्रे नसलेल्या या ओमनीतून वाळू वाहतुक होते. त्यामुळे पोलीस वा महसूल विभागाकडून ही वाहने पकडली तरी कागदपत्रेअभावी मूळ मालकांपर्यंत पोहचता येत नाही.पोलीसांनी पकडलेल्या अशा वाहनांचा खोलवर तपास करून शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे