esakal | धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

बोलून बातमी शोधा

vaccine
VIDEO:धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !
sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः तालुक्यातील कानळदा येथील लसीकरण केंद्रातून दोन पारिचारिकांनी कोरांना लसीचीं चोरी करून त्या लसी त्यांच्या नातेवाइकांना एका गाडीत देत असताना नागरिकांना त्यांना रंगहात पकडले. ही घटना आज दूपारी घडली. याप्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यावरून आरोग्य विभागाचे धिंडवडे बाहेर आले आहेत.

हेही वाचा: Video मानवतेला काळिमा फासणारी घटना..मयताच्या खिशातून काढली रोख रक्कम; प्रकार कॅमेरात कैद

शहरासह जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा आहे. अनेकवेळा लसीकरण केंद्रे लसी अभावी बंद पडले. नागरिक लस मिळावी म्हणून तासनतास रांगेत उभे राहतात. तरीही त्यांना लस मिळत नाही.

कानळदा येथेही ही स्थिती आहे. नागरिकांना लस मिळत नाही. तासनतास रांगेत उभे राहावे लागते. आज दूपारीच्या वेळी दोन पारिचारिकांनी लसीची चोरी करून आय.कार्ड घालून त्या केंद्राबाहेरील रस्त्यावर आल्या. त्यांनी एका चारचाकी गाडीतील नागरिक, महिलांना लसी टोचून दिल्या. बाबत नागरिकांना माहिती होताच त्यांनी गाडी अडवीत लसीकरण बाहेर कसे झाले याचा जाब विचारला. पारिचारीकांनाही उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. याप्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: कर्करोगाने पिडीत चिमुरडी..कोरोनाशी लढली अन्‌ जिंकली

याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना विचारले असता कानळदा लसीकरण केंद्राबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी माहिती देवू शकतील. असे सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांना विचारला असता त्यांनी फोन घेतला नाही.

संपादन- भूषण श्रीखंडे