केळी पीकविमा योजनेत आकड्यांची गडबड!

Crop Insurance News: विमा कंपनीला योजनेत सहभागी शेतकऱ्याने १५ हजार रुपये विमा हप्त्यापोटी दिले असतील तर त्याला किमान १२ हजार रुपये परतावा मिळायला हवा.
banana crop
banana cropbanana crop

अडावद ः हवामानावर (Weather) आधारित फळ पीकविमा योजनेत (Fruit Crop Insurance Scheme) २०२०-२१ मध्ये परताव्यासंबंधीची परिमाणके किंवा परतावा निकष बदलल्याचा चांगलाच लाभ विमा कंपनी व संबंधित घेण्याच्या स्थितीत आहेत. या योजनेत काही मंडळांमधील शेतकऱ्यांना (Farmers) खूश करण्यासाठी परताव्यांचा किरकोळ लाभ देण्यासाठी तापमान व इतर आकडेवारीत गडबड करण्यात आली आहे. योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी शरद जोशीप्रणीत राज्य शेतकरी संघटनेने (Farmers Association) केली आहे. (banana crop insurance scheme temperature figures shown incorrectly)

banana crop
भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेतही भागवतांय कोरोनाग्रस्त कुटूंबाची क्षुधा

या योजनेत तापमानासंबंधी आकड्यांमध्ये गडबड करून फक्त भोकर, भालोद व अडावद या तीनच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी परतावे देण्यासाठी अनेकांना मॅनेज करण्यात आल्याचा दावा राज्य शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण गुर्जर यांनी केला आहे. गुर्जर यांनी याबाबत विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक समाधान पाटील व अधिकारी देवीदास कोळी यांच्याशी संपर्क साधून म्हणणे सांगितले. श्री.गुर्जर यांनी सांगितले, की तापमानाचे आकडे मॅनेज करून भोकर व इतर मंडळांमधील काहीच शेतकऱ्यांना परतावे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत सर्व बाबी बाहेर आणल्या जातील.

...अशी आहे तफावत

भोकर नजीकचे पिंप्राळा व यावलमधील इतर मंडळे, चोपड्यातील गोरगावले व इतर महसूल मंडळदेखील परताव्यासाठी पात्र ठरायला हवे. भोकर येथे मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस तापमान होते. त्याच वेळी अशी नोंद पिंप्राळा व गोरगावले येथील हवामान केंद्रात कशी झाली नाही, असे किरण गुर्जर यांनी सांगितले. त्यावर हवामान केंद्र हे स्कायमेट कंपनीचे आहेत. आकडे शासन आम्हाला पुरविते. आपण ते माहितीच्या अधिकारात मागवा. आकडे चुकीचे असतील तर आमच्या कंपनीचे परतावे वाचतील, कंपनीलाच फायदा होईल, असे कंपनीचे कोळी यांनी किरण गुर्जर यांना सांगितले. या वर्षी विमा कंपन्यांना जवळपास ५० कोटींपर्यंत फायदा होण्याची शक्यता आहे, असे किरण गुजर यांनी सांगितले.

banana crop
जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

किमान परतावा मिळायला हवा

शरद जोशी संघटनेचे माजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कडूअप्पा पाटील यांनीदेखील विमा कंपनीच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काही शेतकरी तुपाशी व काही उपाशी, असा प्रकार होऊ नये. विमा कंपनीला योजनेत सहभागी शेतकऱ्याने १५ हजार रुपये विमा हप्त्यापोटी दिले असतील तर त्याला किमान १२ हजार रुपये परतावा मिळायला हवा. कोविड, महागाईत शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशात शेतकऱ्यांची आकडे मॅनेज करून पिळवणूक करणे, निकष बदलून फसवणूक, लुबाडणूक करणे योग्य नाही. योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना परतावे दिले जावेत, असेही किरण गुर्जर व कडूअप्पा यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com