esakal | दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमले नव्हे..!
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Raut

दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमले नव्हे..!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


चोपडा : दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट राज्यातील विविध प्रलंबीत प्रश्नासाठी तसेच विकास कामाबांबत भेट घेतली. कोणताही मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटू शकतात. याचा चुकीचा अर्थ विरोधकांनी काढू नये. पंतप्रधान यांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमले अशा गैर समजूतीत राहू नये खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले.

(chief ministers visit prime minister should not be misinterpreted mp sanjay raut explanation)

हेही वाचा: शिवसेना स्टाईलने वागा कोणी अडविणार नाही !

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत असून आज सायंकाळी चोपडा येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांनी पत्रकार घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Water Supply Minister Gulabrao Patil) , सेना संपर्क प्रमुख विलास पारकर, संजय सावंत, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी उपस्थित होते.

शरद पवार हे ज्येष्ठ मार्गदर्शक
यावेळी राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाघाची मैत्री सुरुवातीपासूनच होती. ही मैत्री काही सोपी नसते. वाघ हा वाघच असतो, पिंजऱ्यातला असो की जंगलातला असो. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे. शरद पवार हे या सरकारचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांनी जे सुतोवाच केले ते राज्यातील जनतेच्या मनातली भावना आहे. ते योग्य तेच बोलले आहेत.
आगामी निवडणूका संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले म्हणाले की, आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवणार आहे. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, ही चांगली गोष्ट आहे. काँग्रेस केंद्रात सत्ता आणणार तर त्यांचे स्वागत आहे त्यांचा पंतप्रधान व्हायला पाहिजे. पक्षाचा पंतप्रधान व्हावा ही आमची पण इच्छा आहे.

हेही वाचा: नंदुरबारमध्ये भाजप, मनसेला खिंडार; अनेकांनी बांधले हातावर शिवबंधन

खडसेंच्या ताकदीचा फायदा आघाडीला होणार

कुणी कितीही मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले तरी या सरकारने दीड वर्ष कालावधी पूर्ण केला आहे. उरलेला साडेतीन वर्षाचा कालावधी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पूर्ण करतील आणि ते ही महाविकास आघाडीचे सरकार असेल. महाविकास आघाडी महासागर आहे. यात अनेक जणांना यावेसे वाटते. माजी आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तेसुद्धा महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यांची ताकद आघाडीला निश्चितच मिळेल. त्यातून शिवसेना समर्थक पक्ष बळकट होणार असेल तर ती सुद्धा चांगले आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदार जाहीर होत नाही असा प्रश्न विचारला असता यावर राऊत म्हणाले की,त्या 12 आमदारांच्या यादीत तुमच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्याचे नाव आहे. राज्यपाल यांना एखाद्या कार्यक्रमास बोलावून हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.