esakal | चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द !
sakal

बोलून बातमी शोधा

चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द !

पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी 
आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या टोकरे कोळीच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द !

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : चोपडा विधानसभा मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी लता चंद्रकांत सोनवणे यांनी 2019 मधे निवडणूक लढवली होती. यावेळी सौ सोनवणे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी आमदार लता सोनवणे यांच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयाने या खटल्याचा निकाल बुधवारी रोजी लागला.
जात पडताळणी समितीने आमदार लता सोनवणे यांचे नाम निर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र रद्द ठरवले आहे.या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आवश्य वाचा- विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या यादीत एकनाथ खडसेंचे समावेश
 

सन-2019 मध्ये चोपडा विधानसभा मतदार संघ-(10) अनुसूचित जमातीच्या राखीव जागे साठी अनुक्रमे  लताताई चंद्रकांत सोनवणे(शिवसेना),जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी),प्रभाकर गोटू सोनवणे,(भाजप बंडखोर),सौ माधुरी किशोर पाटील(अपक्ष) डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला(अपक्ष),या प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली होती. निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सौ सोनवणे या निवडून आल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना मिळाली होती. निवडणुकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी 
आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या टोकरे कोळीच्या जात प्रमाण पत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.


सदर खटल्याची सुनावणी होऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार येथे त्या खटल्याचा निकाल 4 रोजी निकाल दिला असून यात जात पडताळणी समितीने आमदार सौ लता ताई चंद्रकांत सोनवणे यांचे नाम निर्देशन पत्रा सोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाण पत्र अवैध ठरवले आहे. तसेच आमदार सौ लताताई सोनवणे यांनी विधानसभा निवडणुकी पूर्वी जळगाव महानगर पालिका निवडणुकीत अनुसूचित जमाती या राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत सौ सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देखील नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे.तसेच अर्जदार यांनी मूळ जमातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्या पासून आठ दिवसांच्या आत नंदुरबार येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.

महापालिकेत त्याच प्रमाणपत्रावर निवडणूक लढलवली

समितीने जळगाव महानगर पालिका निवडणुकीत लता सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातुन निवडणूक लढवली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवलेला असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पळताळणीचे विनियमन ) अधिनियम,2000 च्या कलम-10 व 11 अन्वये उचित कारवाई
करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असे देखील आदेशात म्हटले आहे.

आवर्जून वाचा- अखेर शिवसेनेने रघुवंशींना दिलेला शब्द पाळला ! -

नंदुरबार जात पडताळणी समितीने आमचे म्हणणे मांडण्यास संधी दिली नाही.समितीने दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत.

-प्रा चंद्रकांत सोनवणे माजी आमदार चोपडा 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image