दुबार पेरणीचे संकट; बियाणे-खतांचा शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुबार पेरणीचे संकट; बियाणे-खतांचा शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका

दुबार पेरणीचे संकट; बियाणे-खतांचा शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका



चोपडा :पावसाअभावी ( No Rain) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांच्या (Kharif crops) दुबार पेरणीचे संकट ( Double sowing Crisis) ओढवले असून पेरणी केल्यानंतर पाऊस न आल्याने लहान कोंब नष्ट होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे दुबार पेरणीची शक्यता वर्तविली जात आहे. हवामान खात्याच्या (Weather department) अंदाजानुसार अजून पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने पेरणी केलेली पीक वाया जाण्याची शक्यता असून शेकडो हेक्टर वर पेरणी केलेले बियाणे (Seeds) ,खते (Fertilizers) वाया जाणार असल्याने अगोदर आर्थिक संकटात ( Financial crisis)सापडलेला बळीराजा पुन्हा संकटात सापडणार आहे.

(due to lack of rain the farmer was in financial crisis)

चोपडा तालुक्यातील ६४ हजार ४९० हेक्टर एकूण क्षेत्रापैकी ४९ हजार ९६५ हेक्टर वर म्हणजे ७७.४७ टक्के पेरणी झाली आहे.बागायती क्षेत्रात संकरित बी.टी.कापूस, मिरची, केळी,ऊस लागवड झाली आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, तूर, कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांची पेरणी केली परंतु त्यावर पाऊस पडला नाही यामुळे दुबार पेरणीचे संकट बळीराजावर येऊन ठाकले आहे. यंदा पावसाचे अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन मका,तूर, मूग,उडीद,तीळ आदी वाणांचे बियाणे महागाईने घेतले आणि पेरले आहे. तारीख ३० जून ते ४ जुलै दरम्यान कडक ऊन पडल्याने पिकांचे कोंब जळून जात आहेत. पावसाचे चिन्हे दिसत नसल्याने आभाळाकडे आशाळभूत नजरेने बळीराजा पाहत आहे.

अशी झाली आहे पेरणी

तालुक्यात खरीप हंगामात पिकनिहाय झालेली पेरणी हेक्टर मध्ये बाजरी- ५३१ हेक्टर, ज्वारी- १ हजार ७०९ मूग -३ हजार ७८० सोयाबीन -७५४,मका-७ हजार ८५६,तूर -३८४,कापूस -२१ हजार ८६५ बागायती,तर जिरायती -१० हजार ६०५,उडीद- ९७५ अशी एकूण ४९ हजार ९६५ हेक्टर वर पेरणी झाली आहे.

पावसाची दडी घामाच्या धारा,पाऊस नाहीच..!

तालुक्यात दि २८ चा दिवस वगळता २३ जून पासून म्हणजे जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे आतापर्यंत तालुक्यातील सात मंडळात एकूण ६२.०९ मि.मी.इतका पाऊस पडला असून दि २८ रोजी चोपडा - ३८मि.मी,अडावद-१३ मि मी. धानोरा - ११ मि.मी.,गोरगावले-८९ मि.मी., चहार्डी-४ मि.मी.,हातेड-३मि.मी.,लासूर-६ मि.मी.इतका पाऊस पडला त्यांनतर पावसाचा एक थेंब नाही यामुळे बळीराजा चिंतातुर झाला असून पहिल्यांदाच डोक्यावर कर्जाचा डोंगर त्यात पुन्हा दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :Farmer