महावितरणचा भोंगळ कारभार; अकरा वर्षीय बालकाचा शॉक लागुन मृत्यु

अमोल महाजन 
Friday, 2 October 2020

मृतदेहाचे शवविच्छेदन करू परत आणल्यावर देखील विज वितरणचे एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने नातेवाईक व ग्रामस्यांचा संताप अनावर झाला. 

धानोरा ता.चोपडा: येथून जवळच असलेल्या मोहरद येथे विज वितरणच्या भोंगळ कारभाराचा एक बारा वर्षीय शाळकरी मुलगा बळी ठरला वीजेचा खांबावर उतरलेल्या वीज प्रवाहाचा खेळतांना जोरदार शाॅक लागुन या चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संतप्त नातेवाईकांनी विजवितरणच्या भोंगळ कारभारावर रोष व्यक्य करत प्रेत चक्क धानोरा विज कार्यालयात आणून कारवाईची मागणी केली. यावेळी अडावदचे स.पो.निरिक्षक यांनी तात्काळ धानोरा गाठत जमावास शांत केले.
 

आवश्य वाचा- ‘हाथरस’चे जळगावात संतप्त पडसाद
 

धानोरा रोडलगत राहत असलेले डिगंबर पाटील यांचा पाचवीत असलेला मोठा मुलगा क्रिष्णा डिगंबर पाटील (वय ११) हा मराठी शाळेजवळ गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास खेळत होता. तेथून शेतशिवारात विजप्रवाह जाणारा एका खांबावर वीजेचा प्रवाह उतरेला होता. यात त्याचा त्याला धक्का लागताने तो जागेवरच कोसळला सोबत खेळणाऱ्या मुलांनी तशी माहीती जवळ असलेल्या ग्रा.पं कर्मचारी रमेश मोरे याला सांगताच त्याने त्याला लाकडाच्या साह्याने दुर करत नातेवाईकांना घटना कळवली. बालकाला  तात्काळ धानोरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याला डाॅ. उमेश कवडीवाले यांनी मृत घोषीत केले. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी हृदय पिळवून टाकणारा आक्रोश केला व गाववर शोककळा पसरली.

प्रेत आणले विज कार्यालयावर

मृतदेहाचे शवविच्छेदन करू परत आणल्यावर देखील विज वितरणचे एकही अधिकारी घटनास्थळी न आल्याने नातेवाईक व ग्रामस्यांचा संताप अनावर झाला. मोहरद जाणारी मृतदेहाची गाडी परत बोलवत थेट धानोरा विजवितरण कार्यालयाय नेली, येथे नातेवाईकांनी विजवितरच्या भोंगळ कारभावर संताप व्यक्त करत सदोष मणुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व व मृताच्या नातेवाईकांना तात्काळ मदतीचे लेखी द्या अशी मागणी केली.

 

पोलिस तत्काळ हजर

परिस्थीती गंभीर होत असल्याची माहीत अडावदचे स.पो.निरिक्षक योगेश तांदळे यांना कळताच त्यांनी तात्काळ ए.एस.आय जगदीश कोळंबे यांच्यासह धानोरा गाठत नातेवाईकांच्या भावना समजून घेत शांततेने मार्ग काढण्याचे आव्हान केले. यावेळी येथे उपस्थीत झालेले चोपड्याचे उपकार्यकारी अभियंता एम.एस.सावकारे यांनी मृतास पाच दिवसात सानुग्रह मदत देऊन पुढील शासकीय मदत देण्यासाठी प्रस्ताव तयार करून मदतीचे आस्वासन एपीआय यांच्या  उपस्थीत दिले. यानंतर संध्याकाळी सात वाजता मोहरद येथे या चिमुरड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda Eleven-year-old boy dies of electric shock nger of the villagers over the management of MSEDCL