esakal | अखेर..अनेर नदी खळखळली !
sakal

बोलून बातमी शोधा

Aner River

अखेर..अनेर नदी खळखळली !

sakal_logo
By
ॲड. बाळकृष्ण पाटील

गणपूर (ता. चोपडा): गेले महिनाभर काठावरील शेतकरी (farmer) ,नागरिक , स्वयंसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी (political leder) , आमदार (mla) यांच्या प्रयत्नानंतर अखेर अनेर धरण (Aner Dam) पात्रातून आज अनेर नदीत (Aner River) दहा वाजता पाण्याचे पहिले आवर्तन (water rotation) सोडण्यात आले.आणि गेले चार महिने उघडी पडून दगडगोटे तापून आग ओकणारी अनेर थंड होऊन आज खळखळू लागली आहे.

(farmer citizens political leder Aner river demands water rotation)

हेही वाचा: धक्कादायक प्रकार..काकाच्या घरात पुतण्याने रचला दरोड्याचा कट

धरण पात्रातून 2.584 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या दोन्ही तीरावरील जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरिकांना कालच या संदर्भात सूचित करण्यात आले होते. अनेर नदीच्या पूर्व भागात जळगाव जिल्ह्यातील गणपूर ,भवाळे,धानोरे गलंगी,वेळोदे ,घोडगाव,कुसूम्बा, मोहीदे ,दगडी अनवरदे ही गावे आहेत .तर पश्चिम भागात धुळे जिल्ह्यातील तोंदे ,भावेर ,होळनांथे,घोडीसगाव, भोरटेक, पीळोदे,मांजरोद ही गावे आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात संसर्गाची तीव्रता कमी,पण मृत्यूचे भय कायम !

पाण्याचे पूजन

दरम्यान घोडगाव (ता चोपडा) येथील अनेर नदीपात्रात नदीत सोडलेल्या पाण्याचे पूजन अनेर काठ संघर्ष व निर्माण समिती मार्फत करण्यात येणार आहे.

हेही वाचा: धुळे जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले जाणार !

नागरिकांच्या समस्या लक्षात घेता मागणीवरून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून ते दोन ते तीन दिवस सुरू राहील.

बी. के. राजपूत,शाखा अभियंता ,अनेर पाटशाखा, हिसाळे (जि. धुळे)

(farmer citizens political leder Aner river demands water rotation)