कपाशीवरील पांढऱ्या डागांची शेतकऱ्यांत धास्ती

Jalgaon Farmer News: जिल्ह्यात पाऊस नगण्य असूनही पुन्हा ही भीती निर्माण झाल्याने कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
cottan crop
cottan cropcottan crop

गणपूर(ता चोपडा): जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात 22 व 23 जुलै ला पडलेल्या पावसाच्या (Rain) शिडकाव्यानंतर कपाशीच्या (Cotton) पिकावर दिसलेल्या पांढऱ्या थर (white spots) व आवरनामुळे शेतकरी (Farmer) वर्गात धास्तीचे वातावरण पसरले असून त्यासाठी घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

(farmers were frightened by the white spots on cotton bms86)

cottan crop
पूर तुमचा; पूर आमचा चिखल मात्र सारखाच

जिल्ह्यात पाऊस नगण्य असूनही पुन्हा ही भीती निर्माण झाल्याने कापूस उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.काही तासात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी धास्तावले असून काहींनी त्यासाठी फवारणीची तयारीही सुरू केली आहे.दरवर्षी एखाद्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होण्याचे दरवर्षाचे अनुभव आहेत.

पोलुशन व काही अंशी पावसाच्या पाण्यात सोडियमयुक्त प्रमाणामुळे असे घडते. पाऊस आल्यावर ते धुतले जाईल. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही.

- पी.व्ही.देसाई , तालुका कृषी अधिकारी,चोपडा

cottan crop
डॉ. आंबेडकरांची रक्षा घेण्यासाठी झेलल्या होत्या अंगावर काठ्या

खाऱ्या पाण्याच्या पावसामुळे असे घडते.मोठ्या पावसात धुतले जाइल. बर्निंग प्रॉब्लेममुळे शिरेच्या टोकाला एखादे छिद्र पडू शकते.नुकसान होणार नाही.गांडूळ पाणी फवारल्यास तीव्रता कमी होईल.

- महेश महाजन ,शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र ,पाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com