
खरीप पूर्व कपाशी लागवड धोक्यात ,बळीराजाचे डोळे आभाळाकडे
गणपूर (ता चोपडा) : खानदेशात (khandesh) वरून राजा बरसणार या आशेवर 18 मे पासून लागवड करण्यात आलेल्या खरीपपूर्व कपाशीचे (cotton) पीक (crop) धोक्यात आले आहे.मधल्या काळात पाऊस (Rain) येईल या आशेवर अधिक क्षेत्रावर लागवड झाली असून आता या पिकाला वेळेवर पाण्याच्या पाळ्या मिळत नसल्याने पीक कोमेजू लागले आहे.पावसाने गुंगारा दिल्याने बळीराजाचे (Farmer) डोळे आभाळाकडे लागले आहेत.
(khandesh threatening rain fed cotton planting)
हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस २० जूननंतरच !
खानदेशात काहीही म्हटले तरी उन्हाळी कपाशीची लागवड मे च्या दुसऱ्या पंधरवडा सुरू होताच सुरू होते.हे पीक आता महिन्याचे होण्यात आले तरी पावसाच्या पाण्याचा त्याला अभाव जानवू लागला आहे.
खानदेशात मोठी लागवड..
खानदेशातील काही भागात पाऊस झाला असला तरी बऱ्याच भागात तो नाही त्यामुळे लागवड झालेल्या संपूर्ण कपाशीला पाण्याची गरज असली तरी दिवसाकाठी एक बिघा शेताला पाणी देणे कठीण जाऊ लागल्याने हे पीक वाळू लागले आहे. खानदेशात आतापर्यंत सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
हेही वाचा: पहिल्या दिवशी शिकवायचे काय ?..शाळांसमोर प्रश्न
पावसाचे पाणी गरजेचे..
विहीर वा ट्युबवेल चे पाणी कितीही भरले तरी ते कमीच आहे.त्यासाठी पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पावसाच्या पाण्याची गरज आहे. त्यात 20 जून नंतरच पावसाची शक्यता वर्तवण्यात येऊ लागल्याने आता हे पीक वाचवावे कसे अशी चिंता उत्पादकांना लागली आहे. तो पर्यंत पाऊस न आल्यास काही क्षेत्रावरील पीक वाया जाण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गणपूर(ता चोपडा)20 मे ला लागवड झालेल्या पिकाची पाण्याची गरज पूर्ण होत नसल्याने हे पीक वाळू लागले आहे.
Web Title: Marathi News Chopda Khandesh Threatening Rain Fed Cotton
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..