esakal | सरकार विरोधात बोलण्यासाठी केंद्रातून राणेंना मिळाला लाडू
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Gulabrao Patil-Minister Narayan Rane

फक्त सरकार विरोधात बोलण्यासाठी केंद्राचा राणेंना मिळाला लाडू

sakal_logo
By
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा


चोपडा : केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Minister Narayan Rane) साहेबांना मोठा लाडू भेटल्यामुळे त्यांना बोलणे गरजेचे आहे, बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही चाबी भरल्याशिवाय हे खेळणे चालत नाही असे वक्तव्य पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केले.

(minister gulabrao patil accused narayan rane of speaking against the government)

हेही वाचा: मध्य प्रदेशातील हे दहा प्राचीन किल्ले तुम्ही पाहिलेत का?

चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आज २ कोटी ४ लक्ष ५० हजार किंमतीचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन सोहळा सकाळी १०.०० वाजता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

राणेंनी केली होती टिका..

मुख्यमंत्र्यांनी लोकांना तत्काळ मदत केली पाहिजे होती; पण या राज्यात मुख्यमंत्रीपण नाही आणि प्रशासनही नाही. चिपळूणमधील लोकांचे स्थलांतर केले नाही, जेवणाची व्यवस्था केली नाही. मग प्रशासन काम करते, असं कसं म्हणायचे, यास चिपळुणातील प्रशासन बेजबाबदार आहे. एक केंद्रीय मंत्री असताना सोबत राज्याचे विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असतांना पूरग्रस्त पाहणी दौऱ्यामध्ये एकही अधिकारी उपस्थित राहत नाही. आढावा बैठकीला एकही अधिकारी उपस्थित नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली होती.

हेही वाचा: केळी पीकविमा योजनेत आकड्यांची गडबड!

राणेंचे म्हणणे चुकीचे

त्यावर आज दि. २६ रोजी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खोचक टिकेवर बोलते केले असता ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य चालविता येत नसेल व प्रशासन नाही असे म्हणणे पुर्णतः चुकीचे आहे. तलाठी ग्रामसेवक तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन हे सर्व मैदानात असून सर्वतोपरी मदतकार्य करीत आहेत नारायण राणे यांचे म्हणणे अतिशय चुकीचे आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने कोरोना आला परंतु कोकणात पाऊसही भरपूर आला असे म्हणायला काय हरकत आहे. यावर एकच हशा झाला.

loading image
go to top