शिवसेनेच्‍या या नेत्‍याची आमदारकी जाणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या अनुसूचित जमाती साठी राखीव जागेवर लता सोनवणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या निवडणुकीनंतर त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार माजी आमदार जगदीशचंद्र वडवी यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

चोपडा (जळगाव) : चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे यांनी 2019 मध्ये निवडणुकीवेळी सादर केलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने रद्द ठरविले आहे.

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या अनुसूचित जमाती साठी राखीव जागेवर लता सोनवणे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या निवडणुकीनंतर त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार माजी आमदार जगदीशचंद्र वडवी यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जात पडताळणी समितीने बुधवारी {ता.4) हा निर्णय दिला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, आमदार सोनवणे यांनी विधानसभेचे पूर्वी जळगाव महापालिका निवडणुकीतही अनुसूचित जमाती या राखीव जागेसाठी निवडणूक लढविली होती. त्यावेळी जोडलेले जात प्रमाणपत्र ही रद्द ठरविण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात योग्य कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असेही आदेशात म्हटले आहे.

नंदुरबार जात पडताळणी समितीने आमचे म्हणणे मांडण्यास संधी दिली नाही. समितीने दिलेल्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करणार आहोत. 
- प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चोपडा.

या निर्णयाचा मला परिवाराला माझे कार्यकर्ते वने त्यांना आनंद झाला आहे. उशिरा का असेना पण न्याय मिळाला हा आमच्या आदिवासी बांधवांना मिळालेला न्याय असून यामुळे माझा आदिवासी समाजाला आज समाधान व आनंद आहे. आजच्या निकालाने न्यायव्यवस्थेवरील माझा विश्वास द्विगुणीत झाला आहे. 
- जगदीशचंद्र वळवी, माजी आमदार चोपडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda mla lata sonawane crimiliar certificate cancal camety