सावधान : जळगाव जिल्ह्यात पून्हा कोरोनाचे रुग्ण वाढले 

सचिन जोशी
Tuesday, 22 December 2020

जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला असताना कोरोना रुग्णसंख्याही वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तीन महिन्यांपासून संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे चित्र होते.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. त्यामुळे पन्नाशीच्या आत राहत असलेली नव्या रुग्णांची संख्या मात्र मंगळवारी वाढल्याने जळगाव जिल्ह्याची चिंता वाढवणारी आहे.

महत्वाची बातमी- जळगावात यंदाची थर्टी फर्स्ट होणार अशी; नवे नियम लागू

 

दिवसभरात ५७ नवे रुग्ण आढळून आले तर ३१ रुग्ण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलेला असताना कोरोना रुग्णसंख्याही वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तीन महिन्यांपासून संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्याचे चित्र असताना आता पुन्हा रुग्णवाढीची भीती व्यक्त होत आहे.

सोळाशे जणांचे अहवाल

गेल्या काही दिवसांपासून पन्नासच्या आतच नव्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र, मंगळवारी जवळपास १६०० चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ५७ नवीन रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५५ हजार ४५८ वर पोचली आहे. तर ३१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्यांचा आकडा ५३ हजार ७५२ झाला आहे. रिकव्हरी रेट ९६.९२ टक्के असून आज एकही मृत्यू झाला नाही. 

आवश्य वाचा- शौचास दोघे शेतात गेले आणि जीव गमावून बसले; कसा ? वाचा सविस्तर -
 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ८, अमळनेर ६, रावेर ८, चोपडा व चाळीसगाव प्रत्येकी ३, पारोळा ५, यावल व एरंडोल प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona jalgaon patient number increased