
वाढणाऱ्या रुग्णसंख्येत शुक्रवारी दिलासा होता, मात्र आज दिवसभरात ३५ रुग्ण आढळून आले आहे ही जळगाव शहरासह जिल्ह्याची चिंता वाढवणारी आकेडवारी आहे.
जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी जास्त काही दिवसापासून दिसत आहे. गुरूवारी जास्त रुग्ण आढळले होते. तर शुक्रवारी रुग्णसंख्या कमी आली होती. आज ३५ नविन जिल्ह्यात रुग्ण संख्या असून जळगाव शहरात सर्वात जास्त १२ तर त्या पाठोपाठ भुसावळ शहरात ७ रुग्ण पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जळगाव व भुसावळ शहरासाठी धोक्याची घंटा आहे.
आवर्जून वाचा- मुंबईला रेल्वेने निघाले आणि लाख रुपये गमावून बसले !
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत होते. मात्र दररोज आढळून येणारे रुग्ण वाढत आहे. चाचण्या कमी होऊनही रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसत होते. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येत शुक्रवारी दिलासा होता, मात्र आज दिवसभरात ३५ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५६ हजार ५८६ झाली आहे. तर ३६ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा ५४ हजार ७५६ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही ही दिलासा देणारे चित्र आहे.
वाचा- रावेर येथे कोंबड्या दगावल्या; पशुपाल्यांमध्ये चिंतेचे वातावरण
आठ तालुके निरंक
जिल्ह्यात आज ३५ रुग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरात १२, भुसावळला ७, रावेर ५, पारोळा, चोपडा ३, जळगाव ग्रामीण २, तर चाळिसगाव, यावल, धरणगाव येथे प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे