गावासाठी तिने विकले सौभाग्याचे लेणे; अन्‌ भरला महावितरणचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch nandini patil

गावासाठी तिने विकले सौभाग्याचे लेणे; अन्‌ भरला महावितरणचा दंड

अमळनेर (जळगाव) : मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणे असते. मात्र गावासाठी सरपंच महिलेने हेच सौभाग्याचे लेणे विकून महावितरणाचा (Mahavitaran) दंड भरला. गावाचा कारभारी कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. एकीकडे गावकऱ्यांच्या भल्यासाठी वीजचोरीचा आधार घेतला असला तरी त्याचा दंड भरणे हे आद्य कर्तव्य आहे; हेही त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. त्या कारभारी आहेत (Dabhashi sarpancha nandini patil) दभाषी (ता. शिंदखेडा) येथील लोकनियुक्त सरपंच नंदीनी पाटील. (dabhashi-village-sarpanch-sold-Mangalsutra-and-mahavitaran-bill-paid)

हेही वाचा: वादळी पावसाने आजींना केलं बेघर...

ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता. त्याची तात्पुरता टेस्टींग करण्यासाठी ग्रामपंचायतीने वीजचोरी केली होती. त्यावर विरोधकांनी तक्रार केल्याने ग्रामपंचायतीला दंड ठोठावण्यात आला. तो दंड सरपंच नंदीनी पाटील यांनी स्वतः मंगळसूत्र सुत्र व दोन सोन्याच्या अंगठ्या विकून ८४ हजार ८० रूपयाचा दंड भरला.

टेस्‍टींगसाठी टाकला आकडा

दभाशी गावात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून मागील वर्षी प्रथम लोकनियुक्त सरपंच नंदिनी विकास पाटील यांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करून नियमित पाणीपुरवठा करून घेतला होता. आठ दिवसांनी येणारे पाणी आता दररोज येवू लागले होते. तसेच ग्रामस्थांना शुध्द आर.ओ. पाणी फिल्टर ५ मार्च २०२१ रोजी बसविण्यात आले. टेस्टींगसाठी तात्पुरते पाणी फिल्टरचे कनेक्शन वीज चोरी अर्थात आकडी टाकून घेण्यात आले होते.

हेही वाचा: सव्वा महिना उपचार; ऑक्सीजन लेव्हल ७५ असताना कोरोनाबाधित महिलेचे वाचले प्राण

विरोधकांची तक्रार अन्‌

विरोधकांनी त्याची तक्रार नाशिक व जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकारींना करून कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावरून २८ मेस महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नरडाणे येथील पथकाने पाणी फिल्टर व इतर ३ मोटरींचे पाण्याचे कनेक्शन कट करून दभाशी ग्रामपंचायत वर कार्यवाही करून ८४ हजार ८० रूपये इतका दंड ठोकण्यात आला.

कर भरण्यास पैसा नसल्‍याने अडचण

या संकटाला तोंड देण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील वरीष्ठ ग्रामस्थांना बोलवण्यात आले व याविषयी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेतुन घरपट्टी व पाणीपट्टी गोळा करून दंड भरण्यात यावा असे ठरले; त्याप्रमाणे गावात वसुली करण्यासाठी गेले असता सध्या गावातील बहुतांश ग्रामस्थांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून असल्याने सध्या कुणाकडे पैसे नाहीत असे वसुलीत निदर्शनास आले. या दभाशी गावातील ग्रामस्थांना होत असलेल्या अवहेलना सरपंच नंदिनी विकास पाटील यांना पाहिले गेले नाही. त्यांनी स्वतःचे मंगळसुत्र व २ अंगठ्या विकून त्या पैशांनी महावितरणचे ८४ हजार ८० रूपये इतका दंड भरला व लवकरच दभाशी गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. दभाशी गावातील प्रथम नागरिक या नात्याने दभाशी गावातील समस्त ग्रामस्थांचे संकट हे आपले स्वताचे संकट समजून जी भूमिका घेतली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :DhuleJalgaonmahavitaran