वाढीव बिलांच्या विरोधात भाजप आक्रमक...लाईट बिलांची केली होळी !

दगडू पाटील
Wednesday, 29 July 2020

लॉकडाऊन काळात लोकांचा रोजगार पूर्णपणे बंद होता जेमतेम आता सर्वांची गाडी रुळावर येत आहे आणि त्यातच सरकार व विद्युत मंडळाचा मनमानी कारभार.

धरणगाव : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मोलमजुर,शेतकरी,छोटे व्यापारी,हात विक्रेते इत्यादीना लॉकडाऊन कार्यकाळात काम धंदे बंद असल्यामुळे उपजीविकेचा फटका बसला असे असतांना सुध्दा सरकारने वीज बिल माफ न करता वीज दर वाढवून नागरिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या विरोधात भाजप ने कोरोना लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वीज बिलाची होळी केली

एप्रिल,मे,जून,या तीन महिन्याचे एकत्रित बिल न पाठविता ते माफ करायला हवे तसे न करता जो व्यक्ती तीनही महिन्याचे बिल अदा करेल त्याला 2% सूट देण्यात येईल असे शासनाने जाहीर केले आहे , पंरतु लॉकडाऊन काळात लोकांचा रोजगार पूर्णपणे बंद होता जेमतेम आता सर्वांची गाडी रुळावर येत आहे आणि त्यातच सरकार व विद्युत मंडळाचा मनमानी कारभार,मात्र भारतीय जनता पार्टी असा अन्याय होत असतांना शांत बसणार नाही म्हणून आज MSEB च्या कार्यालयात वीज बिलांची होळी करून भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले.

त्याचबरोबर जीनस कंपनीचे मीटर लावण्यात येऊ नये अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे .आंदोलनाचे नेतृत्व भाजप जेष्ठ नेते शिरीष बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन,माजी सभापती पुनीलाल महाजन,अँड भोलाणे बापु शहराध्यक्ष सुनील वाणी,शेखर पाटील यांनी केले. त्याप्रसंगी मधुकर रोकडे,नगरसेवक गटनेते कैलास माळी सर,ललित येवले,शरदअण्णा धनगर,गुलाब मराठे,कडू बयस,भालचंद्र माळी,दिलीप महाजन,सुनील,चौधरी,कन्हैया रायपूरकर,सचिन पाटील,टोनी महाजन,राजू महाजन,प्रल्हाद पाटील,अमोल कासार,शरद भोई,विकास चव्हाण,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dharngaon BJP aggressive against increased bills and light bills fire