एरंडोल तालुक्यात स्वतंत्र बाजार समिती, शेतकी संघासाठी प्रयत्न सुरू  

अल्हाद जोशी
Friday, 20 November 2020

स्वतंत्र बाजार समिती स्थापन व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच निर्णय होईल. 

एरंडोल : एरंडोल तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती व्हावी तसेच शेतकी संघ देखील तालुक्यासाठी स्वतंत्र हवा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. शेतकी संघाच्या प्रांगणात शासकीय धान्य खरेदी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते ज्वारी,मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

वाचा- खिर्डीचा उत्‍कर्ष गिनीज बुक रेकॉर्डवर; अठरा वर्षापुर्वीचा रेकॉर्ड काढला मोडीत

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन व्हावी यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु असून लवकरच निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला.शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतक-यांची लुट होणार नाही याची खबरदारी घेण्याची सुचना त्यांनी केली.शेतकरी रक्ताचे पाणी करून अन्नधान्य पिकवतो त्यामुळे त्याला दिल्यास शिवसेना पदाधिकारी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.मागील वर्षी शासामीय धान्य खरेदी केंद्राच्या अनेक तक्रारी आल्या होत्या,यावर्षी असे प्रकार घडायला नको असे सांगितले.

 

यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी यांनी कासोदा येथेही शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी केली.शेतकी संघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सुत्रसंचलन केले. संचालक विजय महाजन यांनी आभार मानले.कार्यक्रमास तहसीलदार अर्चना खेतमाळीस, नगराध्यक्ष रमेश परदेशी,शेतकी संघाचे अध्यक्ष निळकंठ पाटील,उपाध्यक्ष संजय जाधव,संचालक प्रकाश ठाकूर,दीपक वाणी,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, सदस्य विवेक पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख वासुदेव पाटील, शहरप्रमुख कुणाल महाजन,वि धानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erando efforts continue for erandol taluka Independent market committee, shetki sangh