esakal | वाळूमाफियांविरोधात चार गावांचा ‘एल्गार’!
sakal

बोलून बातमी शोधा

sand

वाळूमाफियांविरोधात चार गावांचा ‘एल्गार’!

sakal_logo
By
अल्हाद जोशी

एरंडोल : तालुक्यातील खेडी खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी, कढोली येथील ग्रामस्थ अवैध वाळू (sand) वाहतुकीविरोधात आक्रमक झाले असून, अशा ट्रॅक्टर, डंपरचालकांवर कारवाई करावी, अन्यथा बेमुदत उपोषण (Fasting) करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. याबाबत प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलिस (Police) निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले. (four village agitation against illegal sand transportation)

हेही वाचा: कृषी कंपन्यांना निधी वितरणाबाबत राज्य शासनाची दुटप्पी भूमिका

तालुक्यातील खेडी खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी, कढोली या ग्रामपंचायतींनी ठराव करून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खेडी खुर्द ते दापोरी व रवंजे बुद्रुक, रवंजे खुर्द या मार्गाने बरेच डंपरचालक दररोज रात्री-बेरात्री अवैध वाळू वाहतूक करतात. खेडी खुर्द ते रवंजे बुद्रुक या रस्त्याने त्यांचा नेहमी वापर सुरू आहे. या रस्त्याने रवंजे खुर्द, रवंजे बुद्रुक, दापोरी, खेडी खुर्द येथील शेतकऱ्यांची शेती असल्यामुळे बैलजोडीसह शेतमजूर देखील येथून जा-ये करतात. मात्र, वाळूच्या वाहनांमुळे या ठिकाणी छोटे -मोठे अपघात नित्याचे झाले आहे. ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शासनामार्फत खेडी खुर्द ते रवंजे खुर्द या रस्त्याचे डांबरीकरण चार महिन्यांपूर्वीच झाले आहे. मात्र, अवजड वाहनांमुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता दाबला गेला आहे. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध कडक कारवाई कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यास परिसरातील सर्व ग्रामस्थ उपोषणास बसतील, असे निवेदनात म्हटले आहे. या या निवेदनावर खेडी खुर्दच्या सरपंच वैशाली कोळी, रवंजे बुद्रुकचे सरपंच गोकुळ देशमुख, दापोली सरपंच तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती भिका कोळी, नीलेश पाटील, किशोर भिल, कढोली सरपंच किरण नन्नवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू!


निवेदन देताना माजी सभापती भिका कोळी, रवंजे सरपंच गोकुळ देशमुख, श्रीकांत महाजन, संजय धनगर, खेडी येथील पन्नालाल सोनवणे, सुरेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, नारायण सोनवणे, साहेबराव सोनवणे, कढोली येथील किरण सोनवणे, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांनाच प्रश्‍न‍

रात्री वाळुची वाहतूक
दररोज रात्री महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुमारे चाळीस ते पन्नास वाहनातून वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. संपूर्ण जिल्ह्यात वाळूचे ठेके बंद असताना रवंजे, खेडी, दापोरी, कढोली, हणमंतखेडे, उत्राण परिसरातून वाळू वाहतूक बिनधास्तपणे सुरू होती. वाळूमाफियांची मोठी दहशत या परिसरात निर्माण झाली असून, वाळू चोरीविरोधात तक्रार करणाऱ्या ग्रामस्थांना वाळूमाफिया आणि त्यांच्या साथीदारांकडून धमकावण्यात येते. मात्र, असे असताना या भागातील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच महसूल कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. वाळूमाफियांना पायबंद घालण्यास स्थानिक महसूल कर्मचारी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणारे वाळूमाफिया वाळूची जादा दराने विक्री करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करीत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्वत: लक्ष घालून वाळूचोरट्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

loading image