esakal | सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांनाच प्रश्‍न‍
sakal

बोलून बातमी शोधा

Education

सेतू अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांनाच प्रश्‍न‍

sakal_logo
By
देविदास वाणीजळगाव : सर्व विद्यार्थी मागील वर्षीपण मोबाईल नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमात (Online teaching) सहभागी झाले नाही. क्रमिक अभ्यासक्रम व ‘सेतू अभ्यासक्रम’ सर्व शेवटी अभ्यासक्रमच आहे. जर मुले शाळेत येऊ शकत नाही, ऑनलाइनसाठी त्यांच्याकडे मोबाईल नाही, मग ‘सेतू अभ्यासक्रम’ (Education) काढून काय साध्य होईल. कारण मूळ मुद्दा ‘मुलांकडे मोबाईल (Mobile) नाही’, हा प्रश्न तसाच अतुत्तरित आहे. कारण मुलांना संपूर्ण सूचना देण्यासाठी व दररोज अभ्यास सोडवून घेण्यासाठी मुलांना ४५ दिवस रोज मार्गदर्शन करायचे आहे. त्यासाठी मुले प्रत्यक्षात समोर किंवा ऑनलाइन समोर असणे गरजेचे आहे. जर मुले समोर नसतील तर लेखी स्वरूपात किती व कसे मार्गदर्शन मिळण्याबाबत शिक्षण आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे. (questions to teachers about setu curriculum)

हेही वाचा: बीएचआर प्रकरणः मालमत्ता व्यवहारांच्या तपासावर होणार ‘फोकस’


शिक्षण विभागाच्या सूचनेनूसार १ जुलैपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यात मागील वर्षी जे शिक्षण घेतले त्याचीच उजळणी आहे. विद्यार्थी कंटाळत असल्याचे चित्र आहे. शिक्षक त्यांच्याच मोबाईलवर शिकवतात, मात्र विद्यार्थ्यांच्या ते पचनी पडत नाही. या अभ्यासक्रमांची पुस्तके नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ४५ दिवसांत हा अभ्यासक्रम कसा पूर्ण शिकवावा, असे प्रश्‍न शिक्षकांसह शिक्षण व प्रशिक्षण संस्थेलाही पडले आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातून कोरोनाचा परतीचा प्रवास सुरू!शिक्षकांना पडलेले प्रश्‍न...
- अभ्यासक्रम ऑनलाइन राबवावा की ऑफलाइन हे स्पष्ट होत नाही?
- सेतू अभ्यासक्रमाची पुस्तिका शासनाकडून उपलब्ध होणार आहे का?
- ऑनलाइन शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे अशक्य? इतरांचे कसे?
- १४ ऑगस्यपर्यंत सेतू अभ्यासक्रमच घ्यायचा, की चालू इयत्तेचा अभ्याससुद्धा घ्यायचा?
- ५० टक्के शिक्षक उपस्थिती असताना ४५ दिवसांत कोर्स पूर्ण करणे शक्‍य आहे का?
- विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांचे कसे? एकत्रीत करून? भेटून? वा शाळेत बोलावून पूर्ण करायचे?
- ग्रामीण भागात ऑनलाइन अभ्यासाला अडचणींचा डोंगर
- चालू वर्षाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके कधी उपलब्ध होणार?
- नियमित अभ्यासक्रमाला सुरवात केव्हा करायची?
- मुलांकडे मोबाईल नाही, हा मूळ मुद्दा अनुत्तरित ठेवून सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती होतेय
- शिक्षकांनी केवळ व्हॉट्सअॅपवर सेतू अभ्यासक्रमाची फक्त पीडीएफ पाठवायची का?
- विद्यार्थ्यांना प्रत्येक भाग कसा सोडवावा याची संपूर्ण सूचना व्हॉट्सॲपवर देता येणे शक्‍य आहे का?

loading image