मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेला दिले लग्नाचे आमिष, आणि चार वर्ष केला अत्याचार ! 

अल्हाद जोशी
Wednesday, 28 October 2020

शिक्षिकेवर अत्याचार प्रकरणी शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच मुख्याध्यापकाच्या कृत्यामुळे पालक वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एरंडोल : लग्नाचे आमिष दाखवुन मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेबरोबर शारीरिक संबंध ठेऊन चार वर्ष अत्याचार केल्याची तक्रार पिडीत शिक्षिकेने पोलीस स्थानकात दिल्यामुळे मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिक्षिकेने मुख्याध्यापाकाविरुद्ध तक्रार दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून पालक वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आवश्य वाचा- लॉकडाऊमूळे उधवस्त होणारा संसार वेळेत सावरला !

याबाबत माहिती अशी ,की नंदगाव (ता.एरंडोल) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असलेले महावीर गोविंदराव भिंगोले यांनी त्याच शाळेत शिक्षिकेस लग्नाचे आमिष दाखवुन 2 ऑक्टोंबर 2016 ते 23ऑगस्ट 2019 असे सुमारे चार वर्ष शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केले. सदर मुख्याध्यापकाने शारीरिक संबंधाचे मोबाईल चित्रण करून तसेच अश्लील फोटो काढले असल्याचे शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

24 ऑगस्ट 2019 रोजी शिर्डी येथे लग्न करावयाचे आहे असे शिक्षिकेला सांगून त्यांना शिर्डी येथे बोलाऊन घेतले.शिर्डी येथील हॉटेल वर्धमान मधील खोली क्रमांक 203 मध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.तसेच तुझे कोणाशीही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली.महिला शिक्षिकेकडून पैसे उकळले व ए.टी.एम.कार्ड देखील स्वत:जवळ ठेऊन घेतले.सदर मुख्याध्यापकाने तो राहत असलेल्या असलेल्या अष्टविनायक कॉलनीतील भाड्याच्या खोलीत देखील सदर शिक्षिकेला बोलावुन अनेक वेळा शारीरिक संबंध केले असल्याचे शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

सदर मुख्याध्यापक विवाहित असून शिक्षिका घटस्फोटीत आहे.याबाबत शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून मुख्याध्यापक महावीर भिंगोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार मिलिंद कुमावत तपास करीत आहे.मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षिकेवर लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार केल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच मुख्याध्यापकाच्या कृत्यामुळे पालक वर्गात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erandol headmaster tortured the fellow teacher by offering her marriage