वाळूचोरी रोखण्यासाठी विशेष पथक; तीन तालुक्यांवर ‘वॉच’ 

आल्‍हाद जोशी
Sunday, 8 November 2020

एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीनही तालुक्यांत वाळूसह अन्य गौणखनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असून, शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. 

एरंडोल (जळगाव) : येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अंतर्गत येणाऱ्या एरंडोल, धरणगाव व पारोळा या तालुक्यांत गौणखनिज चोरी रोखण्यासाठी प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह अमळनेर, चोपडा व चाळीसगाव उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशाने महसूल व पोलिस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीनही तालुक्यांत वाळूसह अन्य गौणखनिजाची मोठ्या प्रमाणावर चोरी होत असून, शासनाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. 

एरंडोल तालुक्यासाठी तीन पथक नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील वैजनाथ, टाकरखेडा परिसरासाठी निवासी नायब तहसीलदार एस. पी. शिरसाठ यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथकात मंडळ अधिकारी विनायक मानकुंबरे, तलाठी सलमान तडवी, डी. एन. ठोंबरे, सुधीर मोरे, हवालदार संतोष चौधरी व कोतवाल सुदाम पाटील यांचा समावेश आहे. उत्राण हनमंतखेडेसिम परिसरासाठी नायब तहसीलदार आर. एस. जोशी यांची पथकप्रमुखपदी नियुक्ती झाली असून, अव्वल कारकून किशोर उपाचार्य, तलाठी शेख, पी. डी. पाटील, विश्वंबर शिरसाठ, हवालदार सुनील पाटील व कोतवाल जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे. खेडी, कढोली, रिंगणगाव, दापोरी या परिसरासाठी मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांची पथकप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, अव्वल कारकून नंदकिशोर वाघ, तलाठी भरत पारधी, ए. पी. सुर्वे, नंदकुमार शिंदे, अतुल तागडे, हवालदार संदीप पाटील व कोतवाल अमोल पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यासाठी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारोळा शहर व चिंचखेडा परिसरासाठी नायब तहसीलदार शिंदे पथकप्रमुख असून, मंडळ अधिकारी एस. पी. पाटील, तलाठी पी. बी. निकम, एस. आर. हादुळे, ए. एस. शेळके, हवालदार किशोर पाटील, शशिकांत निकम व कोतवाल रमेश निकम यांचा समावेश आहे. करमाड, तामसवाडी, टोळी परिसरासाठी अव्वल कारकून एस. पी. पवार पथकप्रमुख असून, सदस्य म्हणून मंडळ अधिकारी जी. एस. पाटील, तलाठी एस. एन. जोशी, ए. ए. जंजाळे, हवालदार प्रकाश चव्हाण, आशिष चौधरी व कोतवाल अनिल पाटील यांचा समावेश आहे. हिवरखेडे, महाळपूर व बहादरपूर परिसरासाठी मंडळ अधिकारी पी. जी. गांगुर्डे पथकप्रमुख असून, सदस्य म्हणून तलाठी पी. पी. शिंदे, एम. आर. बोपचे, एस. व्ही. वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक कुणबी, हवालदार विनोद साळी व कोतवाल भारत पवार यांचा समावेश आहे. धरणगाव तालुक्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात बांभोरी प्र.चा. परिसरासाठी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड पथकप्रमुख असून, मंडळ अधिकारी वनराज पाटील, तलाठी बालाजी लोंढे, जी. डी. बिन्द्वाल, पी. डी. पाटील, हवालदार प्रवीण पाटील, होमगार्ड नंदू चौधरी व कोतवाल धनराज भोई यांचा समावेश आहे. बाभूळगाव व चाम्गाव परिसरासाठी नायब तहसीलदार सातपुते पथकप्रमुख असून, मंडळ अधिकारी एस. आर. बोरसे, तलाठी आरिफ शेख, महेंद्र वंजारी, आर. एस. ढेरंगे, हवालदार दीपक पाटील, गिरिधर महाजन व कोतवाल शालिग्राम कुंवर यांचा समावेश आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news erndol valu chori three special squad watch